Breaking

Gondia Crime : जीवंत काडतुसांसह दोघांना अटक !

 

Two arrested with live cartridges : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

gondia  रिसामा परिसरात अवैध शस्त्र बाळगून नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीकडून एक लोखंडी पिस्तुल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आली. सोबत अंदाजे 35 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी (दि. 4 जानेवारी) रोजी रात्री पॅट्रोलिंगच्या दरम्यान करण्यात आली.

नरेश उर्फ शैलेश सुरेश तिराले (वय 34 वर्षे, रा.फुक्किमेटा ह.मु. रिसामा ता. आमगाव) व इजाज इस्माईल खान (वय 35 वर्षे, रा. मामा चौक, गोंदिया) असे आरोपींचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांनी कारवाईचे नेतृत्व केले. शनिवार, 4 जानेवारी रोजी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव परिसरात अवैध कृती करणारे / अवैध शस्त्र बाळगणारे/ चोरी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध/ गुन्हे प्रतिबंधक पॅट्रोलिंग करीत होते.

Nagpur Zilla Parishad : जलजीवन मिशनलाच हवे ऑक्सीजन !

यावेळी पथकास रिसामा आमगाव येथील स्थानिक नागरीकांना माहिती मिळाली. 1 जानेवारी 2025 रोजी नरेश तिराले हा त्याच्या जवळील शस्त्रांद्वारे लोकांमध्ये दहशत माजवत होता. मात्र त्याच्या भितीमुळे लोकांनी त्याच्याविरूध्द तक्रार दिलेली नाही. याबाबतची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आली. शहानिशा करून मिळालेल्या बातमीच्या आधारे पथकातील पोलीस अधिकारी-अंमलदार यांनी 4 जानेवारी 2025 रोजी छापा घालून कारवाई केली. यात अवैधरित्या विना परवाना अग्निशस्त्र बाळगून दहशत माजविणारा नरेश उर्फ शैलेश सुरेश तिराले यास ताब्यात घेण्यात आले.

Prakash Ambedkar : वंचितच्या राष्ट्रीय कार्यसमितीची घोषणा !

सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा मित्र इजाज इस्माईल खान याच्याकडून शस्त्र आणल्याचे सांगीतले. यावरून इजाज खानला सुध्दा ताब्यात घेण्यात आले. विनापरवाना अवैधरित्या अग्नीशस्त्र (पिस्तुल) बाळगुन सर्व सामान्य जनतेच्या मनात अग्निशस्त्राद्वारे भीती निर्माण करून दहशत पसरवील्याबद्दल नमूद दोन्ही आरोपीताविरूध्द कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदयान्वये आमगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आले. दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमाल (पिस्तूल, काडतूस)सह आमगाव पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले. पुढील कारवाई प्रक्रिया आमगाव पोलीस करीत आहेत.