Breaking

Governor C.P. Radhakrishnan : विद्यापीठातून शिकवला जावा ‘पर्यावरण संवर्धन!

New paths to be explored from the International Conference on Climate Change : ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’मधून गवसतील नवनवे मार्ग

Chandrapur News : शिक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्याची गरज आहे. त्यासाठी पर्यावरण शिक्षणाला प्राधान्य द्यावे लागेल. पर्यावरण संवर्धन किंवा संरक्षण असा विषय प्रत्येक विद्यापीठात शिकविला जावा त्यातून पर्यावरणतज्ज्ञ तयार होतील. पर्यावरण रक्षणाच्या नव्या कल्पना जन्माला येतील. नवे प्रयोग होतील आणि त्यातूनच संवर्धनाचे नवनवे मार्गही गवसतील, असा विश्वास महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

एसएनडीटी महिला विद्यापीठातर्फे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज-2025’चे गुरुवारी (दि. १६ जानेवारी २०२५) महामहीम राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या तीन दिवसीय संमेलनाला आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच एसएनडीटीच्या कुलगुरू डॉक्टर उज्वला चक्रदेव,आमदार देवराव भोंगळे, जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह, एसएनडीटीचे विलास नानीवाडेकर, युएसचे कॉन्सिलेट जनरल सलील कादेर, कुणी युनिव्हर्सिटी न्यूयॉर्कचे प्राध्यापक नील फिलिप, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसएनडीटी कॅम्पस संचालक राजेश इंगोले, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, गोंडवानाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे आदींची यावेळी उपस्थिती होती.

Indian Railway Ministry : जनतेनेच घेतला फॉलो-अप; रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी!

इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज चंद्रपूरमध्ये करायची आहे, हे मी वनमंत्री असताना एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू उज्वला चक्रदेव यांच्याशी बोलून ठरवले होते. चंद्रपूर हे क्लायमेंट चेंजसाठी उपयुक्त स्थान आहे. म्हणून ही तीन दिवसीय कॉन्फरन्स आपण येथे घेत आहोत, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले. यामध्ये तीन दिवस चर्चा व्हावी, येवढाच उद्देश नाही, तर यामध्ये झालेल्या चर्चेवर, निर्णयावर गतीने अंमलबजावणी व्हावी, हा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही ते म्हणाले.

पर्यावरण संवर्धनासाठी लोकशिक्षण, संशोधन, अंमलबजावणी हीच त्रिसूत्री असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले, यंदा संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. संविधानाने आपल्याला दिलेले हक्क सर्वांना माहिती आहेत. पण संविधानाने दिलेल्या जबाबदारीचा, आपल्याला सांगितलेल्या कर्तव्यांचा विसर पडला आहे. तीन दिवसांच्या परिषदेत पर्यावरण संवर्धनाच्या कर्तव्यावर चर्चा होईल असा विश्वास आहे. त्यासाठी लोकशिक्षण, संशोधन, कृती आणि अंमलबजावणी यावर भर दिला पाहिजे.’ सी फॉर चंद्रपूर, सी फॉर क्लायमेट चेंजच्या युद्धात सर्वांत आघाडीवर राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Right to Education : १ हजार २९१ विद्यार्थी ठरतील आरटीईचे लाभार्थी!

या परिषदेत फक्त भाषणे ऐकण्याचे काम होऊ नये. चर्चा आणि संवाद होईल. चिंता व्यक्त होईल. पण केवळ त्यापुरती ही परिषद मर्यादित राहू नये, असा माझा आग्रह आहे. तीन दिवस चर्चा अवश्य करा. पण पण ज्ञान पुस्तकात बंद असेल तर त्याचा उपयोग नसतो. क्लायमेट चेंजवरही आजवर खूप परिषदा झाल्या. पण अंमलबजावणी होत नाही. आपल्याला कृती करायची आहे आणि उपायांवर अंमलबजावणीही करायची आहे, असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी केले. जेणेकरून जेव्हा क्लायमेट चेंजचा इतिहास लिहिला जाईल, तेंव्हा त्यात चंद्रपूरचे नाव असले पाहिजे असेही ते म्हणाले.