Hair loss case: Distribution of selenium enriched wheat continues : गव्हामध्ये सेलेनियम हा विषारी घटक आढळला असताना वितरण सुरूच
Buldhana : जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात खळबळ उडवलेल्या केसगळती प्रकरणाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहायला तयार नाही, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या अॅड. जयश्री शेळके यांनी केला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे वाटप होणाऱ्या गव्हामध्ये सेलेनियम हा विषारी घटक आढळला असताना अद्यापही त्याचे वितरण का सुरू आहे, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
जिल्ह्यातील केसगळती प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे जयश्री शेळके यांनी म्हटले आहे. तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी ICMR (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च)च्या पथकाने प्रभावित भागातील रुग्णांचे आणि परिसरातील विविध नमुने गोळा करून दिल्ली, भोपाळ आणि चेन्नई येथे पाठवले होते. मात्र, या तपासणी अहवालाचा उशीर सरकारच्या दिरंगाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
याशिवाय, ज्येष्ठ संशोधक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी केलेल्या अभ्यासात सेलेनियमयुक्त गव्हामुळे केस गळतीसह इतर आरोग्यविषयक गंभीर परिणाम होऊ शकतात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे हा धोका ओळखून सरकारने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे, असेही शेळके यांनी स्पष्ट केले.
Robbery in Nagpur : नोकराने मालकाच्या डोळ्यात मिरचीपूड झोकली अन् मग..
तत्काळ गहू जप्त करण्याची मागणी..
जी गावे या दूषित गव्हाच्या वितरणाने प्रभावित झाली आहेत, तेथील संपूर्ण गहू तातडीने जप्त करून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या गव्हाचे वितरण करावे, अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे. तसेच, या प्रकरणाचा अहवाल त्वरित जाहीर करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी लावून धरली आहे.
Nagpur Traffic Police : शहरातील अस्ताव्यस्त वाहतूक बघून तुम्हाला पण राग येतो का ?
या गंभीर परिस्थितीत सरकार नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनीही उपस्थित केला आहे. सरकारने वेळ न दवडता तातडीने उपाययोजना करावी, अन्यथा याचा मोठा फटका जनतेला बसू शकतो, असा इशाराही शेळके यांनी दिला आहे.