NCP’s power show of strength in Morshi : मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश; शेतकरी व शिक्षणविरोधी धोरणांवर टीका
Amravati ‘भाजपा सरकारच्या सत्ताकाळात शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचा माल मातीमोल दराने विकला जात आहे. शिक्षणव्यवस्था कोलमडली आहे,” अशी घणाघाती टीका माजी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन ऊर्फ भैय्यासाहेब देशमुख यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नरेंद्र जिचकार यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन देशमुख होते. प्रारंभी क्रांतिसूर्य महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
DCM Ajit Pawar : काय सांगता? अकोला विमानतळाचे उड्डाणही लवकरच!
या वेळी जिल्हाध्यक्ष अनिल जळमकर, गिरीश कराळे, प्रदीप राऊत, सौ. मेघनाताई मडघे, डॉ. प्रदीप कुन्हाडे, सौ. वृशालीताई विधे, प्रवीण चौधरी, शहराध्यक्ष अब्दुल तमिज, सौ. रत्नाताई ढोले, सौ. विद्याताई ढवळे, सौ. प्रज्ञाताई बोडखे, अक्षय गावंडे, हर्षल गलबले, राजू कुकडे आदी उपस्थित होते.
मेळाव्यात आकाश मोझरे, प्रकाश पांडे, सुमित वानखडे, आर्यन टेकोडे, नरेश इंगोले, तुषार गावंडे, गजानन ठाकरे, सचिन वानखडे, सागर ढोंगे, प्रियदर्शन पुंड, अभिलाष भुते, वैभव खाडे, ऋषिकेश देशमुख, हर्ष कडूकार, शुभम वानखडे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशमुख यांच्या हस्ते दुपट्टा घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
CM Devendra Fadnavis: अत्याधुनिक साधनांनी पोलिस दल सक्षम होणार
नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
आकाश मोझरे – मोर्शी शहर उपाध्यक्ष
प्रकाश पांडे – तालुका प्रसिद्धी प्रमुख
सुमित वानखडे – व्यापारी सेल प्रमुख
आर्यन टेकोडे – विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष