Breaking

Harshawardhan Sapkal : जिझिया कराच्या आड भाजपकडून जनतेची लूट!

 

BJP government should stop the looting by imposing jizya tax : पेट्रोल ५१ तर डिझेल ४१ रुपये प्रति लिटर होऊ शकतं

Mumbai : जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल ६५ डॉलर प्रति बॅरल आहे. देशात पेट्रोलचे दर १०९ रुपयाच्या आसपास तर डिझेलचे ९३ रुपयांच्यावर आहेत. भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक जिझिया कर आकारून जनतेची लूट करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

क्रूड ऑईलचे कमी झालेले दर व कररुपी लूट कमी केली तर पेट्रोल ५१ रुपये आणि डिझेल ४१ रुपये प्रति लिटर करणे शक्य आहे. ते सरकारने करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. त्यांनी आकडेवारीसह पेट्रोल, डिझेलचे दर कसे कमी करता येऊ शकतात हे स्पष्ट केले. ते म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर १४५ डॉलर प्रति बॅरलवर पोहचले असतानाही पेट्रोल ७० रुपये लिटर तर डिझेल ४५ रुपये लिटर होते, असं ते म्हणाले.

Harshawardhan Sapkal : संविधान घेऊन ऐतिहासिक काळाराम मंदिरात सपकाळांचा प्रवेश !

आता तर क्रूड ऑईल ६५ डॉलर आहे तरीही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाहीत. युपीए सरकार असताना पेट्रोलवर ९.५६ रुपये तर डिझेलवर ३.४८ रुपये अबकारी कर Excise Tax होता. तो भाजपा सरकारने वाढवत ३२ रुपयांपर्यंत केला. एक्साईज टॅक्स मध्ये आणखी २ रुपयांची वाढ झाली. १ रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता तो आता १८ टक्के केला आहे आणि वरून टोल वसुलीही सुरुच आहे. यातील काळेबेरे काय ते समोर आले पाहिजे, असं सपकाळ म्हणाले.

Harshawardhan Sapkal : अजित पवारांचा धर्मनिरपेक्षतेचा बुरखा टराटरा फाटला !

रशिया भारताला बाजारभावापेक्षा ३० टक्के कमी दराने क्रूड ऑईल देते. त्याचा थेट फायदा हा रिलायन्स व नायरा या दोन कंपन्यांना होतो. ह्या दोन कंपन्या सरकारच्या लाडक्या आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. युपीए सरकार असताना पेट्रोल २ रुपयांनी वाढले तर ट्विट करणारे अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यांच्यासारखे सेलिब्रिटी आणि बाबा रामदेव सारखे स्वयंघोषित संत आता पेट्रोल १०९ रुपयांवर असतानाही गप्प आहेत, याचाही त्यांनी उल्लेख केला.