Maharastra is heading towards Medical Hub : वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणाले, ‘राज्य मेडिकल हबच्या दिशेने’
Nagpur महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात प्रगती होत असून राज्य मेडिकल हब व टुरिझमचे निश्चितपणे केंद्र होईल असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेरिट व गरीब विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यांना उत्तम शिक्षण व सुविधा मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. वैद्यकीय शिक्षणात राज्य अग्रेसर करण्यासाठी आपण पुढाकार घेतलेला आहे. येत्या काळात आपले राज्य मेडिकल हब व मेडिकल टुरिझमचे केंद्र व्हावे यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असा निर्धार मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
Jitendra on Nitin Gadkari : जितेंद्र म्हणाले, गडकरींनी बोलावले म्हणून, नाहीतर बहाणा केला असता !
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्टरांना शिकविण्यासाठी प्राध्यापक नाहीत. एमपीएससीच्या माध्यमातून जाहिराती काढूनही फॅकल्टी मिळत नाहीत. राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचे या विद्यार्थ्यांना कसे मार्गदर्शन मिळवून देता येईल यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपल्याला सूचना कराव्या आपण त्या सूचनांची अंमलबजावणी करू. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्येही तांत्रिक स्टाफ नाही. यातून मार्ग काढण्यासाठीही तज्ज्ञांनी आपल्याला मार्गदर्शन करावे, असे ते म्हणाले.
विविध आजारांनी त्रस्त गरीब लोक माझ्याकडे यायचे. महागडे उपचार त्यांना परवडणारे नव्हते. मी विधी व न्यायमंत्री असताना धर्मादाय दवाखान्यांमध्ये दहा टक्के रुग्णांना मोफत उपचाराचा कायदा केला. त्याचा आपल्याला राजकीय जीवनातही फायदा झाला. आरोग्यविषयक कोणती शासकीय योजना असेल तर त्यात रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेऊ नका, असे आवाहन त्यांनी डॉक्टरांना केले.
Devendra Fadanvis : हजारो लोकांना प्रयागराजला जाऊ न शकल्याचं शल्य होतं, पण..
मुश्रीफ यांनी वैद्यकीय सोयीसुविधा वाढविण्याचा विश्वास तर व्यक्त केला आहे, मात्र राज्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मुलभूत सुविधांचादेखील अभाव आहे. याशिवाय ग्रामीण भागातील स्थिती फारशी चांगली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सकारात्मक चित्र निर्माण करण्यासाठी मुश्रीफ यांना वैद्यकीय तज्ज्ञ व प्रशासकीय यंत्रणा यांची सांगड घालावी लागणार आहे.