The next date on the party and symbol is now November 12th : पक्ष आणि चिन्हावरील पुढील तारीख आता 12 नोव्हेंबर
New Delhi : सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पार पडली, मात्र ही सुनावणी थोडक्यात आटोपली असून पुढील सुनावणीची तारीख 12 नोव्हेंबर अशी देण्यात आली आहे. जवळपास अडीच ते तीन वर्षांपासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, आज निर्णय होईल अशी चर्चा होती. मात्र, सशस्त्र सुरक्षा दलांशी संबंधित महत्त्वाचे प्रकरण ऐनवेळी न्यायालयासमोर आल्यानं शिवसेना वादावरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आली.
आजच्या सुनावणीपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला कळवले होते की, त्यांच्या प्रकरणाची सुनावणी मर्यादित वेळेतच होईल. यावर ठाकरे गटाचे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी “आज सविस्तर सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या,” अशी विनंती केली. न्यायालयाने ती मान्य करत 12 नोव्हेंबर ही नवी तारीख निश्चित केली.
Hunger strike : विदर्भ महसूल संघटनेचं उपोषण २३ दिवसांपासून !
शिंदे गटाकडे सध्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह असल्याने त्यांना घाई नसल्याचं स्पष्ट दिसलं. त्यांनी सुनावणी डिसेंबरमध्ये जरी झाली तरी चालेल, अशी भूमिका घेतली. मात्र सिब्बल यांनी “महाराष्ट्रात जानेवारीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामुळे सुनावणी लवकर घेणं आवश्यक आहे,” असा आग्रह धरला. त्यांनी अंतिम युक्तिवादासाठी फक्त 45 मिनिटे लागतील असं न्यायालयाला सांगितलं.
दरम्यान, शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली ते म्हणाले, न्यायालयात आम्ही आमची बाजू कायद्याच्या चौकटीत राहून भक्कमपणे मांडली आहे. जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल. पण उद्धव गटाची नेहमीच न्यायालयावर टीका करण्याची सवय झाली आहे. निकाल त्यांच्या बाजूने आला तर संविधान जपलं गेलं, आणि विरोधात आला तर संविधानाचा भंग अशी त्यांची मानसिकता आह दरम्यान, ‘तारीख पे तारीख’ हा प्रकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दिसून आला आहे. आता सर्वांचे लक्ष 12 नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लागले आहे.