My friends were harassed before I was arrested, claims Shiv Sena leader Sanjay Raut : ईडीच्या अटकेआधी राऊतांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता
Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (१७ मे) सायंकाळी ६ वाजता मुंबईतील प्रभादेवी नाट्य मंदिरात होणार आहे. पण प्रकाशनापूर्वीच कालपासून हे पुस्तक प्रचंड चर्चेत आलं आहे. कारण या पुस्तकात राऊत यांनी खळबळजनक दावे केले आहेत. महायुतीच्या नेत्यांकडून संजय राऊत यांच्यावर कडवी टीका करण्यात येत आहे.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. संजय राऊत यांना जेव्हा अटक करण्यात आली होती, तेव्हा त्यांनी अमित शाह यांना फोन करून ‘मला अटक करून सुड घ्या’, असं आव्हान दिलं होतं, असा उल्लेख पुस्तकात आहे. ईडीच्या अटकेआधी राऊतांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. मला अटक करण्यापूर्वी माझ्या मित्रांना प्रचंड त्रास देण्यात आला होता, असा दावाही राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे.
Education : मुस्लीम आहे म्हणून मुलीला प्रवेश नाकारला, सचिव, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल !
संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवली आहे. तरीही सर्वकाही लिहीलं नाही, नाही तर याच्यापेक्षाही भयानक खळबळ उडाली असती, असं राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी अमित शाह यांना फोन केल्यानंतर काही वेळाने त्यांना भाजप नेते शेलार यांचा फोन आला होता, असा दावा राऊतांनी केला आहे. ‘तुम्ही अमित शाह यांना फोन केला होता. त्यानंतर त्यांनी मला प्रकरण समजावून घेण्यास सांगितलं’, असं शेलारांनी म्हटल्याचंही पुस्तकात नमूद आहे.
Uddhav Thackeray Shiv Sena : ठाकरेंचा नेता भाजपमध्ये, बुलढाण्यात धक्का!
संजय राऊत यांनी पुस्तकात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. त्यामुळे प्रकाशनापूर्वीच हे पुस्तकावर चौफेर चर्चा घडून टीका होत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही काही दावे राऊत यांनी त्यांच्या पुस्तकात केले आहेत