Doctors will go on strike if state government withdraw the decision : राज्य सरकारने निर्णय मागे न घेतल्यास डॉक्टर संप करणार
Mumbai : राज्य सरकारने होमिओपॅथी डॉक्टरांच्या संदर्भात घेतलेल्या एका निर्णया विरोधात अॅलोपॅथी डॉक्टरांच्या सर्व संघटना एकवटल्या आहेत. होमिओपॅथी चे डॉक्टर आता एक वर्षांचा कोर्स करुन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करु शकतील असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयाला अॅलोपॅथी डॉक्टरांनी विरोध केला असून त्याच्या विरोधात बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे.
या आधी अॅलोपॅथी डॉक्टरांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करता येत होती. त्यांच्यासोबत आता होमिओपॅथी डॉक्टर देखील एक वर्षांचा कोर्स करून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करू शकतात, असा निर्णय सरकारने जाहीर केला. 15 जुलै पासून या नोंदणीला सुरुवात होईल. मात्र यामुळे अॅलोपॅथी डॉक्टरांच्या अस्तित्वाला धोका असल्याचा आरोप केला जात आहे,
Sudhir Mungantiwar : घरकुल योजनेचे काम प्रभावी व समन्वयाने करा !
चार-पाच वर्ष शिकून, मेहेनत करून, पैसे खर्च करून एमबीबीएस, एमडी, एमएस अशा पदव्या मिळवणाऱ्या डॉक्टरांना या निर्णयामुळे भविष्यात धोका निर्माण होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशन, मार्ड बी एम सी, सरकारी डॉक्टरांची संघटना आणि ए एम सी अशा सर्वच संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत लवकरात लवकर निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. नाहीतर सर्वच डॉक्टर संघटना एकत्रित बंदची हाक देणार असल्याचा इशारा दिला आहे.
____