Flying squads deployed to take action against HTBT on the borders of Maharashtra : तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तर आणि सिमांवर असणार करडी नजर
Nagpur : HTBT म्हणजेच ‘हर्बीसाईड टॉलरंट’ (Herbicide Tolerant BT) एक तणनाशक सहनशील बीटी कापसाची जात आहे. या जातीला भारतात कायद्याने परवानगी नाही. तरीही काही ठिकाणी याची लागवड करून उत्पादन घेतले जाते. हा माल जास्त करून परराज्यांतून महाराष्ट्रात येतो. त्यामुळे राज्याच्या सिमांवर तपासणी करण्याच्या सुचना पोलिस विभागाला दिलेल्या आहेत, अशी माहिती नागपूर विभागीय कृषी अधिक्षक मिलिंद शेंडे यांनी दिली.
आज (२३ मे) माध्यमांशी बोलताना मिलिंद शेंडे म्हणाले, प्रत्येक तालुक्यात भरारी पथके आहेत. तालुकास्तरावर ६३ भरारी पथके आणि जिल्हा तसेच विभागीय स्तरावरही भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे केंद्रांवरूनच बियाणे खरेदी करावे. त्याचे बिल घ्यावे आणि पाकिट जपून ठेवावे. यावर्षी चांगला पाऊस होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. साधारणतः ७ जून रोजी मॉन्सून येतो, १२ ते १५ जूनपासून पावसाला सुरूवात होते. चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये.
Fake school ID scam : वंजारी प्राथमिक शिक्षणाधिकारी असतानाच दिली होती बनावट आयडींना मंजुरी !
खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या नागपूर विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात धान, कापूस, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके घेतली जातात. नागपूर विभागाचे शेतीचे क्षेत्र १९ लाख १४ हजार हेक्टर आहे. यावर्षी कृषी विभागाने २० लाख ११ हजार हेक्टरचे नियोजन केले आहे. यामध्ये कापसाचे प्रस्तवित क्षेत्र ६ लाख ३९ हजार हेक्टर आहे. सोयाबीन २ लाख २२ हजार हेक्टर, धानाचे क्षेत्र नागपूर विभागात सर्वाधिक ८ लाख ८० हजार हेक्टर आहे. यामध्ये तुरीचे नियोजन १ लाख ७३ हजार हेक्टरवर केले आहे, अशी माहिती मिलिंद शेंडे यांनी दिली.