Despite 22 operations in a year, mafia has no fear of the administration : रेती माफियांवर वर्षभरात २२ कारवाया; प्रशासनाचा धाक संपला?
Buldhana जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण हे अवैध रेती उपशाचे केंद्रबिंदू बनले असून, महसूल प्रशासनाकडून दीड वर्षांत तब्बल २२ वेळा कारवाई करत ७० अत्याधुनिक बोटी स्फोटकांद्वारे नष्ट करण्यात आल्या आहेत. या कारवायांमुळे २१ कोटी रुपयांचे नुकसान माफियांना सोसावे लागले, तरीही ते नव्या बोटीसह पुन्हा धरणावर स्वार होत आहेत.
रेतीमाफियांना मिळणाऱ्या अवैध कमाईच्या आधारे ते दरवेळी २५ ते ३० लाख किमतीच्या नव्या बोटी खरेदी करत आहेत. यांचा वापर करून धरणाच्या तळातून काळीशार रेती उपसली जाते. सध्या धरणात वीजपंपसदृश पद्धतीने मोठ्या प्रमाणात उपसा करून ती दुसऱ्या बोटीत साठवली जाते आणि मग तटावर नेऊन वितरित केली जाते.
Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana : शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार, नागपूर टास्क फोर्सचा दावा
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शरद पाटील, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ आदींनी आक्रमक कारवाया केल्या. मात्र महसूल प्रशासनातीलच काही ‘घरभेदी’ अधिकारी माहिती गळती करतात, असा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातून होणाऱ्या रेतीच्या अवैध वाहतुकीमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. दररोज ट्रॅक्टर्स व डंपरमधून रेती वाहून नेली जाते. यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून लोक तक्रारी करत आहेत.
Nagpur Vidhan Bhavan : विधानभवनाचा विस्तार ठरला; शासकीय मुद्रणालय देणार जागा
जिल्ह्यातील रेती लिलाव प्रक्रियेतील विलंब, महसूल यंत्रणेमधील निष्क्रियता व पांढऱ्या कॉलरधारींचा छुपा पाठिंबा ही संपूर्ण यंत्रणाच सवालात आणत आहे. येणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये या मुद्याचा जोरदार राजकीय वापर होण्याची शक्यता आहे.