Breaking

Illegal Sand Mining : अधिकारी झोपेत आहे, खडकपूर्णा धरणातून बिनधास्त उपसा रेती!

Villagers warn of agitation against administration : ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा, प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर संताप

Buldhana देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून बोटींद्वारे सुरू असलेल्या अवैध रेती उपशामुळे परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा रोजचा जीव मेटाकुटीला आला आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या या साखळीबद्ध रेतीतस्करीविरोधात ग्रामस्थांनी अनेकवेळा निवेदने दिली, आंदोलने केली, पण प्रशासन केवळ औपचारिक कारवायांपुरतेच मर्यादित राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अवैध रेती वाहतुकीसाठी सततच्या ट्रक व डंपर संचालनामुळे गावातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाणे, शेतकऱ्यांना शेतात जाणे, आणि महिलांना आरोग्यसेवेसाठी बाहेर पडणेही कठीण झाले आहे. या वाहनांच्या अतिरेकामुळे अनेक अपघात घडले असून, काहींनी जीव गमावले, काही अपंग झाले आहेत.

Ladki Bahin Scheme : २२ हजार बहिणी एका महिन्यात ‘नावडत्या’!

रेती माफिया ग्रामस्थांना मारहाण करण्यासाठी अंगावर येतात, असे अनुभव दिले आहेत. यापूर्वी दोन पोलीस कर्मचारी, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनाही माफियांनी मारहाण केल्याची घटना घडल्याचे ग्रामस्थांनी स्पष्टपणे सांगितले आहे. अशा स्थितीत सामान्य गावकऱ्यांना काय न्याय मिळणार, असा सवाल करण्यात आला आहे.

रेती उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटी, ढिगारे आणि अनधिकृत वाहतूक रस्ते यांचे पंचनामे करून ज्यांच्या मालकीतील बोटी आहेत, ज्यांच्या शेतात ढिगारे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची आणि बोजा चढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील आणि सरपंच यांच्यावर कारवाई करून निलंबन वा अपात्रतेचे आदेश देण्याचेही निवेदनातून सूचित करण्यात आले आहे.

Uddhav Balasaheb Thackeray : ठाकरे गटाच्या नियुक्त्या जाहीर, गजानन वाघ जिल्हाप्रमुख

स्थानिकांनी प्रशासनाच्या पथकांवरही सवाल उपस्थित केला आहे. “पथक धरणात गेलं, पण बोटी सापडल्या नाहीत – की मुद्दाम दुर्लक्ष केलं?” असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला असून ही प्रशासनाची ठळक अपयशाची कबुली असल्याचा टोला लगावला आहे.

२८ जुलै रोजी अमरावतीत आमरण उपोषण
ग्रामस्थांनी आजपासून विविध अभिनव आंदोलनांचा इशारा दिला असून, २८ जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालय (अमरावती) समोर आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व संतोष भुतेकर, सचिन कदम, अनिल चित्ते, पांडुरंग देशमुख, दीपक पुंगळे, गजानन देशमुख आदी ग्रामस्थ करणार आहेत.