People of Pakistan are beggars, Asaduddin Owaisi criticizes Pakistan : IMF कडून १ बिलीयन डॉलरचे कर्ज घेतल्यानंतर केली टीका
भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर पाकिस्तानसोबत तीन दिवस संघर्ष चालला. त्यानंतर पाकिस्तानकडूनच शस्त्रसंधीची मागणी करण्यात आली. त्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता युद्धबंदी करण्यात आली. या युद्धबंदीवर विरोधकांनी विविध शंका घेत केंद्र सरकारवर टीका केली. दरम्यान एआयएमएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानची लक्तरं काढली आहेत.
पाकिस्तानचे लोक ऑफीशीअली भिकमांगे आहेत, असे म्हणत ओवेसी यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. IMF कडून एक बीलीयन डॉलरचे कर्ज घेतल्यावरून असदुद्दीन ओवेसी पाकिस्तानवर तुटून पडले आहेत. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, जर आता कर्ज घेण्याची वेळ येत आहे, तर गेल्या ७५ वर्षांत त्यांनी केले काय? इंटरनॅशनल मिलीटंट पाकिस्तानला पैसा देत आहेत आणि या पैशांचा वापर ते भारतामध्ये दहशतवादी हल्ले करणे आणि हिंदू – मुस्लीम यांच्यात फूट पाडण्यासाठी करत आहेत.
Operation Sindoor : खासदाराने एक महिन्याचे वेतन दिले सैनिकांसाठी
मिळालेल्या पैशांतून भारतात हिंदू आणि मुसलमान यांच्या धार्मित तेढ निर्माण करण्यासाठी त्या फंडचा वापर होतो आहे. भीक मागून कुरापाती करण्याची त्यांची सवय आहे. भावलपूरमध्ये हल्ला झाला. त्या हल्ल्यात जो सहभागी होता, तो व्यक्ती अमेरिकी दहशतवादी आहे.
India – Pakistan War : शस्त्रसंधी झाली पण तणाव वाढला, मुंबईत हाय अलर्ट !
युद्धबंदीनंतर जवळपास सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केलेली आहे. पण एआयएमएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानची लक्तरं वेशीवर टांगली आहेत. पाकिस्तानी लोकांना भिकमांगे म्हणत त्यांनी त्यांनी सडकून टिका केली आहे. यावर काय – काय प्रतिक्रिया येतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.