India Front marches against Election Commission in Delhi : दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा
Mumbai / Delhi : महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना ठाकरे गटाने आज राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन उभारले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मुंबईसह सर्व जिल्ह्यांत होत असून, जिल्हाधिकारी कार्यालयांपुढे शिवसैनिकांकडून निदर्शने केली जात आहेत. दुसरीकडे, दिल्लीत इंडिया आघाडीचे खासदार केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कथित पक्षपाती भूमिकेविरोधात मोर्चा काढत आहेत. दोन्ही आंदोलनांमुळे देशाच्या राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.
दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनात उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. महायुती सरकारवर भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा आरोप करत ठाकरे गटाने ‘हनीट्रॅप’सह विविध भ्रष्टाचार प्रकरणांत अडकलेल्या मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेचे म्हणणे आहे की, सरकारने या मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे राज्यभरात जनआक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली असून, सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे, दिल्लीत इंडिया आघाडीतील सर्व विरोधी खासदार निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. राहुल गांधी यांनी नुकतेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. याच पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने आयोगाच्या भूमिकेविरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.
विरोधी पक्षांचा आरोप आहे की, निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेत फेरफार करून सत्ताधारी पक्षाला फायदा मिळवून देण्यात आला. या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी खासदारांनी केली आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख विरोधी पक्ष या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
Mohan Bhagwat : शिक्षण-आरोग्य सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर !
आज महाराष्ट्रात आणि दिल्लीत एकाच वेळी सुरु असलेल्या या दोन आंदोलनांनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारविरोधात आवाज उठत असताना, राजधानीत निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.