Thousands of crores ‘Jio Tower Scam’ exposed : महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये नागरिकांना लुटले
Nagpur २००८ मध्ये 2G Spectrum Scam ने देशाला हलवून सोडले होते. यात जनतेचाच पैसा होता. पण थेट जनतेकडून घेतलेला नव्हता. मात्र, आता जिओ टॉवर स्कॅमने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील सर्वसामान्य नागरिकांना थेट लक्ष्य केलं आहे. यात जिओचे टॉवर लावून देण्याच्या नावावर लोकांकडून हजारो कोटी रुपये उकळण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणाचा तपास आता सरकार कोणत्या पातळीवर करते, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
जिओ कंपनीचे मोबाईल टॉवर लावण्याचे आमिष दाखवून देशभरातील नागरिकांची हजारो कोटींनी फसवणूक करणारी टोळी अस्तित्वात आहे. या टोळीचे कारनामे देशातील २० राज्यांत सुरु आहेत. ही टोळी कर्मचाऱ्यांचा पगारावर महिन्याकाठी एक कोटी रुपये खर्च करीत होती. त्यामुळे या टोळीचा घोटाळा हजारो कोटींच्या घरात असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्था) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (एमपीआयडी) कायद्याअंतर्गत कारवाई केली.
Urology Department of Sawangi Hospital : रोबोटिक सहाय्यक शस्त्रक्रियेने केली जन्मजात व्याधीवर मात !
प्रणव मोंडल, सुभेन्दू मैती व रवींद्रनाथ बॅनर्जी (कोलकाता) हे या टोळीचे सूत्रधार आहेत. त्यांनी टोळी तयार करुन टॉवर उभारण्याच्या नावावर लोकांना लुबाडण्याचा धंदा सुरु केला. त्यात नागपुरातील वैभव दवंडे आणि नागपुरातील कावरापेठमध्ये राहणारा कमलेश गजभिये हे दोघेही सामील झाले. कमलेश गजभीये आणि कोलकात्याचा अलाउद्दीन शेख उर्फ श्रीमंत बछर हे दोघेही दिल्लीच्या एका कंपनीचे सदस्य होते. ती कंपनी बनावट असल्यामुळे बंद पडली. त्यामुळे बछरने कमलेशला फसवणुकीत सहभागी होण्यास सांगितले.
कमलेशने वैभव दवंडे या मित्रालाही सोबत घेतले. दोघांनी नागपुरातील अनेक तालुक्यांत फिरून कोलकात्याच्या टोळीसाठी भाड्याने बँक खाती उघडली. त्या बदल्यात दोघांनाही २५ हजार रुपये प्रति बँक खाते अशी रक्कम मिळाली. वैभव आणि कमलेश यांच्यासारखे दलाल तब्बल २० राज्यात तयार करण्यात आले. अशाप्रकारे महाराष्ट्रातून हजारो नागरिकांनी बँक खाती भाड्याने दिली. त्या खात्यात रोज लाखो रुपयांचा व्यवहार होत होता. या टोळीत पश्चिम बंगालमधील काही पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
CM Devendra Fadnavis महाराष्ट्रात हवे स्वतंत्र आयुष मंत्रालय !
पुण्यातही कोट्यवधीने फसवणूक
आयपीएस अधिकारी अनिल म्हस्के यांनी यांनी हा घोटाळा उघडकीस आणला. याच टोळीने पुणे शहरात काही दलाल हाताशी धरले होते. त्यामुळे पुण्यातील हजारो नागरिकांना जवळपास शंभरावर कोटीने याच टोळीने फसविल्याची माहिती समोर आली आहे. सध्या टोळीतील ४२ आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांची संपत्ती जप्त केली. बँक खाती गोठवली. मात्र, अजूनही अनेक दलाल बँक खात्यातून लाखोंची उलाढाल करीत असल्याची माहिती समोर आली.