Khadse challenges Girish Mahajan over allegations against his son : गिरीश महाजन यांनी मुलावर केलेल्या आरोपावरून खडसेंचे आव्हान
Mumbai : एकनाथ खडसेंवरच मुलाच्या खुनाचा आरोप आहे अशा स्वरूपाचे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच केले होते. त्यानंतर सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे चांगलेच संतापले आहेत. तुमच्यात हिम्मत असेल तर त्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा असे आव्हान त्यांनी महाजनांना दिले आहे. माझ्या एकुलत्या एक मुलाच्या खुनाचा आरोप माझ्यावर करतात, हिमंत असेल तर तात्काळ याप्रकरणाची चौकशी करा असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक युद्ध कायम पाहायला मिळते. हे दोन्ही नेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करत असतात. मात्र, सध्या ‘ हनी ट्रॅप’ प्रकरणातील आरोपी प्रफुल लोढा प्रकरणावरुन दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली आहे. यातच गिरीश महाजन यांनी थेट एकनाथ खडसेंच्या मुलाचे हत्याप्रकरणच चर्चेत आणल्याने खळबळ उडाली. खडसे यांच्या मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता? हे समोर आले पाहिजे. खडसेंनीच त्यांच्या मुलाचा खून केला, असे प्रफुल लोढाने सांगितल्याचा दाखला गिरीश महाजन यांनी दिला होता.
Maharashtra politics : आईच्या नावाने डान्सबार चालवून पोरी वाचवायला लाज वाटत नाही का?
महाजनांच्या या दाव्यावर एकनाथ खडसेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली. हिंमत असेल तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, असे आव्हानच खडसेंनी दिले. माझ्या एकुलत्या एक मुलाच्या खुनाचा आरोप माझ्यावर करतात, हिमंत असेल तर तात्काळ याप्रकरणाची चौकशी करा, असे एकनाथ खडसेंनी म्हटलं. निखिल खडसेंचा मृत्यू झाला त्यावेळी 3 दिवस मी घरीच नव्हतो, त्याच्या मृत्यूच्या दिवशी देखील नव्हतो. माझ्याकडे जमिनी शिवाय काहीच नाही, गिरीश महाजन हा शाळा मास्तरचा पोरगा, मग याच्याकडे इतका पैसा कुठून आला? ह्याच्या जावयाच्या नावाने संपत्ती ठेवली आहे.
Maharashtra politics : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची एवढी मजबुरी काय?
ह्याचा तीन बत्ती येथे फ्लॅट आहे, तो किती किमतीचा आहे याची माहिती घ्या? असे म्हणत गिरीश महाजनांच्या मालमत्तेवर खडसेंनी सवाल उपस्थित केले. प्रफुल लोढावर आत्ताच कसे गुन्हे दाखल व्हायला लागले. अंधेरीला गुन्हा दाखल झाला, साकीनाका पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे. एकाच डीसीपीच्या अंतर्गत गुन्हा दाखल कसा काय होतोय? असा सवालही एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे. सध्या लोढावर वेगवेगळे गुन्हे दाखल होत आहेत, तीन ठिकाणी हनी ट्रॅफ प्रकरणात लोढावर गुन्हे दाखल आहेत.
Maharashtra Politics: ‘रम, रमी, रमणी’च्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय !
गिरीश महाजन हॉटेल ट्रायडन येथे माझे तीन महिने पाय धरत होते. असं प्रफुल लोढा यांनी म्हंटल आहे. हे ट्रायडेंट हॉटेल प्रकरण नेमकं काय यावर बोलताना खडसेंनी स्पष्ट केले की, हनी ट्रॅप मधे गिरीश महाजन आहे, असा माझा संशय आहे. तसेच, मुख्यमंत्री यांच्याबाबत माझा राग नाही. नाशिकमधील व्यक्ती त्यांना माहिती आहे, हॉटेल देखील माहिती आहे. त्यामुळे त्यांनी याची चौकशी करा तात्काळ एसआयटी नेमावी अशी माझी मागणी त्यांनी केली. राज्यात हनी ट्रॅप प्रकरण चांगले गाजत आहे. यात नवनवे आरोप आणि माहिती समोर येत आहे. यातच महाराजांनी खडसें वर आरोप केल्याने खडसे ही त्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.
______