6 lakh 97 thousand 548 women will be benifetted : जिल्ह्यात ६ लाख ९७ हजार ५४८ महिलांना मिळणार लाभ; बँक खात्यात रक्कम जमा होणार
Amravati मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा दहावा हप्ता एप्रिलच्या शेवटी, म्हणजेच ३० एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. याआधी मार्च महिन्यात, जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ८ मार्च रोजी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे दोन हप्ते एकत्रितपणे खात्यावर जमा करण्यात आले होते. आता एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता देण्याची तयारी सुरू असून, तो ३० एप्रिल रोजी खात्यात जमा होईल, असे संकेत महिला व बालविकास विभागाकडून मिळाले आहेत.
Bhandara Municipality : नालेसफाईसाठी २० लाखांचा खर्च; तरीही अस्वच्छता कायम!
जिल्ह्यातील ७,२०,७५६ अर्जदार महिलांपैकी ६,९७,५४८ महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत. यातील २३,०९२ महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. त्यामुळे ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लाभ बंद होतो, परिणामी लाभार्थ्यांची संख्या दरमहा थोडीफार बदलत राहते.
सध्या लाभार्थ्यांची कागदपत्रे आणि पात्रता अटींची पडताळणी सुरु आहे. काही महिलांना योजनेच्या अटींनुसार अपात्र ठरवले जात आहे. त्यामुळे यंदा नेमक्या किती महिलांच्या खात्यावर रक्कम जमा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
RTO Checking : कारवाईनंतर शिरपूरबांध नाक्यावर ‘नो चेकिंग डे’!
२१०० रुपयांचा लाभ कधी?
‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभाची रक्कम १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांमध्ये या वाढीव रकमेबाबत साशंकता असून, २१०० रुपयांचा हप्ता नेमका कधी tv मिळणार? याची प्रतीक्षा लाभार्थी महिलांना लागली आहे.