26 lakh names omitted, Supriya Sule makes serious allegations : 26 लाख वगळली, सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप
Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर मोठा घणाघात केला आहे. “राज्यातील लाडकी बहीण योजनेत तब्बल २६ लाख बहिणींची नावे कमी करण्यात आली आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार या योजनेत जवळपास ४ हजार ९०० कोटी रुपयांचा महाभ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होत आहे. पैसे पुरुषांनी काढले असे सांगितले जाते, पण ते पैसे गेले कुठे, याचे उत्तर सरकारने द्यायलाच हवे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
सुळे म्हणाल्या, “या योजनेतून लाखो महिलांची नावे वगळण्यात आली. महिलांसाठी असलेल्या योजनेतील पैसे पुरुषांनी काढले, हे अत्यंत धक्कादायक आहे. यामुळे सरकारने महिलांच्या हक्कांवरच घाला घातला आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करून जबाबदारांना शिक्षा झालीच पाहिजे.”
Heavy Rain : शेतकरी उद्ध्वस्त, “अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नाही!”
जीएसटी संदर्भात बोलताना सुळे म्हणाल्या, “आज जीएसटीचा उत्सव साजरा केला जात आहे. पण हा निर्णय जर पाच वर्षांपूर्वी घेतला असता, तर आज उत्सवाची गरजच पडली नसती. पी. चिदंबरम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मत याच बाबतीत स्पष्ट होते. उशिरा का होईना, सरकारने योग्य निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार.”
“आमदार नसताना २० कोटी निधी मिळतो,” या शिवसेनेच्या नेत्याच्या दाव्यावरही त्यांनी थेट प्रहार केला. त्या म्हणाल्या, “असे प्रकार घडत असतील तर त्याचे उत्तर महाराष्ट्र सरकारने द्यायलाच हवे. पंतप्रधान स्वतःला ‘प्रधान सेवक’ म्हणवून घेतात, पण महाराष्ट्राचे सरकार त्यांच्याही आदेशांकडे दुर्लक्ष करते, असेच दिसते.”
Rain alert : नवरात्रीत मुसळधार पाऊस: पुढील 24 तास महत्त्वाचे
सुळे यांनी स्पष्ट केले की, “लाडकी बहीण योजनेतील भ्रष्टाचार हा महिलांच्या सन्मानाशी निगडित मुद्दा आहे. हा प्रकार केवळ आर्थिक गैरव्यवहार नाही तर जनतेच्या विश्वासघाताचा आहे. सरकारने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून महिलांना न्याय द्यावा.” अशी मागणीही त्यांनी केली.
____