Ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य

Technical issues resolved, November 18th deadline fixed : तांत्रिक अडचणी दूर १८ नोव्हेंबर शेवटची तारीख निश्चित

Mumbai : राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेबाबत सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ पुढे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी आता अनिवार्य करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागाने या प्रक्रियेसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून, ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख १८ नोव्हेंबर २०२५ अशी जाहीर करण्यात आली आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांचा आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. मागील काही महिन्यांचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर, आता सरकारने लाभार्थ्यांची ओळख पडताळणी आणि पारदर्शकतेसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.

Pay Commission : आठव्या वेतन आयोगाची रचना निश्चित

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मिडियावर माहिती देताना सांगितले की,
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता आणि नियमित आर्थिक लाभ मिळावा यासाठी e-KYC प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर केल्या जात आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.

ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी?
लाभार्थींनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुखपृष्ठावरील e-KYC बॅनर वर क्लिक करून फॉर्म उघडावा. आधार क्रमांक आणि Captcha Code नमूद करून, Send OTP वर क्लिक करावे. आधार लिंक मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit करावे. प्रणालीत लाभार्थीचा आधार क्रमांक पात्र यादीत आहे का, हे तपासले जाईल. त्यानंतर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक व OTP पडताळणी करून पुढील टप्प्याला जाता येईल.

पुढे लाभार्थ्याने जात प्रवर्ग निवडावा आणि खालील बाबींची घोषणा (Declaration) करावी यात, कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत नाहीत किंवा निवृत्तीनंतर पेन्शन घेत नाहीत. कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक केल्यावर “Success तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की, १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व पात्र लाभार्थ्यांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा योजनेचा पुढील लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकतात.

Local Body Elections : झेडपी-पालिकांच्या रणांगणासाठी युती-आघाडीचे ‘गुऱ्हाळ’!

‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारकडून सुरू असलेली ही महत्त्वाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, पात्र महिलांनी निर्धारित मुदतीत e-KYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.