Umed scheme benefits 78 thousand women : आठ तालुक्यांमध्ये लखपती दीदींची संख्या वाढली
Wardha महिलांना आर्थिक उन्नतीसाठी उमेद काम करीत असते. या माध्यमातून अनेक महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सुरुवात केली आहे. या काळात महिलांना आर्थिक हातभार देण्यासाठी फिरता निधी जिल्ह्यात वितरित करण्यात आला आहे. यातून ७८ हजार ६३ महिला अर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्यांचे वार्षिक उत्पन्न सुद्धा वाढले आहे.
फिरत्या निधीच्या माध्यमातून हा पैसा गाव पातळीवर गरजवंतापर्यंत पोहोतच आहे. यामुळे लखपती दीदीचा आकडा वाढण्याचा अंदाज आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी यासाठी ग्रामीण भागत उमेद अंतर्गत कामकाज केले जाते. या कामाला अधिक गती देण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी उमेदच्या माध्यमातून केंद्र शासन ‘लखपती दीदी’ हा उपक्रम राबवीत आहे.
२० मध्ये केंद्र शासनाने सर्वेक्षण केले आहे. यातून काही जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. उमेदच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या बचत स्वयंसहायता समूहामार्फत जिल्ह्यातील आठ तालुक्यात ७८ हजार ६३ महिला लखपती झाल्या आहेत. येणाऱ्या काळात हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात महिला स्वयंसहायता गट १४ हजार २४३ आहेत, तर ग्राम संघ ९५२, प्रभाग शेतकरी ४९ व उत्पादक गट १७ आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील महिला आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत.
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी उमेद मार्फत वर्ष २०२४-२५ मध्ये २० लाख ९५० रुपये कर्जाचे वाटप बचत गटांना केले आहे. तर वैयक्तिक १४ हजार ६१८ रुपये कर्जांची वाटप करण्यात आले आहे. लखपती दीदी म्हणजे स्वयंसहायता समूहातील अशी महिला जिच्या कुटुंबाचे एका वर्षातील चार कृषी हंगामासाठी किंवा चवार व्यवसाय चक्रांसाठींचे मासिक सरकारी उत्पन्न १० हजार रुपये किंवा त्याहून अधिक आहे. आणि वार्षिक सरकारी उत्पन्न एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे.
Forensic investigation van : फॉरेन्सिक वाहनांच्या घोषणेचे काय झाले?
महिलांना कम्युनिटी इन्व्हेस्टमेंट फंडातून एका गटाला ६० हजार याप्रमाणे गावातील गटांना निधी दिला जातो. या शिवाय प्रत्येक महिलांना १५ हजार रुपयांप्रमाणे फिरता निधी सुद्धा दिला जातो. या माध्यमातून महिलांनी आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी शेती, व्यवसाय, कलाकुसर आणि विविध व्यवसायात गुंतवणूक केली जाते.