BJP MLA meets with office bearers and workers : आमदारांची पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत बैठक
Akola आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने तयारीला सुरुवात केली आहे. या अनुषंगाने देवरी फाटा येथील वेताळबाबा संस्थानच्या सभागृहात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार रणधीर सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीत जिल्हा कार्यकारिणी आणि चोहोटा मंडळातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार सावरकर म्हणाले की, “जिल्हा परिषदेच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी असतात. शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतो, परंतु समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्या योजनांचा लाभ पोहोचत नाही, ही खंत आहे.”
Vote theft case : निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुलं !
त्यांनी पुढे सांगितले की, सध्या केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. त्यामुळे अकोला जिल्हा परिषदेतही सत्ता मिळवून गोरगरीब नागरिकांपर्यंत सर्व योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावे.
Vote theft case : शेवटच्या तासात 15 टक्के मते वाढली, हा गंभीर विषय !
या वेळी मंचावर जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकार, शेषराव पाटील, मधुकर पाटकर, विजयसिंह सोळंके, विनोद मंगळे, राजेश नागमते, मंडळ अध्यक्ष विठ्ठल वाकोडे, संदीप उगले, दादाराव पेटे, माधवराव बकाल, राजेश रावनकर, चेतन डोईफोडे, विवेक भरणे, अशोक झांबरे, अनुप साबळे, नामदेवराव कुलट, श्याम राऊत, हरिभाऊ आवारे, मोहन सावरकर, मंगेश घुले, मंगेश ताडे यांसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.