Focus to Be on Strengthening the Organization for Elections : नांदुरा कार्यशाळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल
Nandura आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने रणशिंग फुंकले आहे. पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत आगामी निवडणुकांसाठी संघटन बळकटीकरण, बूथस्तरावर संघटन सशक्त करण्याचे आणि “सत्ता आपल्या हातीच ठेवायची” हा निर्धार करण्यात आला. सत्ता कायम ठेवण्यासाठी सुरू असलेली भाजपची धडपड कितपत यशस्वी होते, हे वेळच ठरवणार आहे.
ही कार्यशाळा नांदुरा येथील स्व. हरिभाऊ पांडव मंगल कार्यालयात जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यक्रमाला राज्याचे कामगार कल्याण मंत्री अॅड. आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार चैनसुख संचेती, प्रदेश सदस्य गुणवंतराव कापले, डॉ. गणेश दातीर, बलदेवराव चोपडे, मोहन शर्मा, राजेश पाटील, भाऊराव पाटील, सौ. कल्पना मसने, अनिता देशपांडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सारिका डागा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यश संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.
Vidarbha Farmers : ३३ हजार शेतकऱ्यांचे नुकसान, अहवाल पाठवून एक महिना झाला!
जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांनी सांगितले की, “घाटाखालील तीन विधानसभा मतदारसंघांत जिल्हा परिषद सदस्य २४, पंचायत समिती सदस्य ४८, नगरसेवक १४१ आणि ग्रामपंचायती २०० निवडणुका होणार आहेत. सक्षम उमेदवार द्या आणि निवडून आणा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले की, “भाजपाच्या प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची विविध शासकीय समित्यांवर नियुक्ती केली जाणार आहे. पक्ष मजबूत करा आणि स्थानिक संस्थांमध्ये सत्ता काबीज करा,” असे त्यांनी सांगितले.
Health Emergency : पिण्याच्या पाण्यात सांडपाणी, शासन-प्रशासन झोपेत!
आ. डॉ. संजय कुटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, “बुथ मजबूत असणे ही विजयाची गुरुकिल्ली आहे. आपले गाव, सर्कल स्वतः सांभाळा. सत्ता आपली आहे, हा आपला सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे. दिवाळीनंतर नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला लागा. तीन उमेदवार तयार ठेवा आणि सर्वेक्षण करून ठोस नाव निश्चित करा,” असा संदेश त्यांनी दिला. प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनीही कार्यकर्त्यांना थेट “कामाला लागा, पक्षाच्या विजयासाठी प्रत्येक बुथवर झटून काम करा” असे आवाहन केले.








