Local Body Elections : भाजपचा तरुण नेतृत्वावर विश्वास; मंदार बाहेकर नवे शहराध्यक्ष

Mandar Bahekar appointed as a new Buldhana city president for BJP :

Buldhana स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन बळकट करण्यासाठी युवा नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी बुलढाणा, मोताळा आणि मेहकरसाठी नव्या नियुक्त्या जाहीर करत पक्ष संघटनेला नवे बळ दिले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या बुलढाणा शहराध्यक्ष पदावर अखेर निर्णय घेत मंदार बाहेकर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर तालुकाध्यक्षपदी सतीश भाकरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोताळा शहराध्यक्षपदी उत्साही कार्यकर्ता सचिन शेळके, तर मोताळा ग्रामीणच्या अध्यक्षपदी सागर पाटील यांची नियुक्ती झाली आहे. मेहकर ग्रामीण भागाची धुरा आता सारंग माळेकर सांभाळणार आहेत.

Local Body Elections : शिंदे गटाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का

या निवडीनंतर भाजपने तरुण आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी देत आगामी निवडणुकांसाठी सज्जता दर्शवली आहे. काही दिवसांपूर्वीच मोताळा नगरपंचायतीतील काँग्रेसचे उपनगराध्यक्ष आणि सहा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठा बळकटीचा फायदा झाला आहे.

Shiv Sena Eknath Shinde : स्थानिक निवडणुका गायकवाड यांच्या नेतृत्वात?

भाजप स्वबळावर निवडणुका लढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी प्रभावी जनसंपर्क असणारी आणि संघटन कौशल्य असलेली टीम तयार करण्यासाठी विजयराज शिंदे यांनी पावले उचलली आहेत. या नियुक्त्या प्रदेश नेतृत्वाशी चर्चा करून निश्चित करण्यात आल्या आहेत.