Reorganization of Pragnak groups in five wards is possible : पाच प्रभागांतील प्रगणक गटांचे पुनर्विभाजन शक्य
Akola आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवरील ४८ हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी पार पडली. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सुनावणीनंतर अंतिम अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. हा अहवाल ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता असून पाच प्रभागांतील काही प्रगणक गटांचे पुनर्विभाजन होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होताच जानेवारीत मनपाची निवडणूक होणार असल्याने राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. प्रारूप प्रभागांची भौगोलिक सीमा ३ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर नागरिक, राजकीय पक्ष आणि विविध संघटनांकडून प्रभाग सीमेतील विसंगती, नैसर्गिक विभागणी, लोकसंख्या प्रमाण आणि स्थानिक गरजांनुसार बदल करण्याच्या मागणीसह ४८ हरकती दाखल झाल्या होत्या. आता अंतिम अहवालात या आक्षेपांवर काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Orders to officers : सर्व अधिकार्यांना फिल्डवर राहण्याचे आदेश !
सन २०१७ च्या निवडणुकीत २० प्रभागांमधून ८० नगरसेवक निवडून आले होते. यंदाही हीच प्रभाग पद्धत कायम ठेवली जाणार असली तरी प्रभाग क्र. ३, ७, ८, ९ व २० मधील काही प्रगणक गटांचे पुनर्विभाजन होण्याचे संकेत आहेत. या बदलाचा फटका भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (एपी) पक्षाच्या माजी नगरसेवकांसह काही अन्य इच्छुकांना बसू शकतो. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता वाढली आहे.
Shivsena: उद्धव ठाकरेंनी केलं सांत्वन; शिंदेंनी थेट मदत पोहोचवली !
निवडणूक जवळ आल्याने माजी नगरसेवकांसह नव्याने निवडणुकीत उतरणारे इच्छुक नागरिकांच्या भेटीगाठी वाढवत आहेत. सकाळपासूनच गल्ल्या–चौकात संवाद साधणे, ज्येष्ठांची आस्थेने विचारपूस करणे, अशा हालचालींना गती मिळाली असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.