Breaking

Maha Politics : आमच्या आमदारांच्या भरवशावर ‘ते’ खासदार झाले !

Ashish Jaiswal said Sanjay Raut became an MP because of our MLAs : लोकनेता म्हणवण्याचा त्यांना अधिकार नाही

Nagpur : शिवसेनेचे (उबाठा) नेते खासदार संजय राऊत हे स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी सतत काही ना काही बदल करत असतात. सध्या तर ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत. संजय राऊत आयुष्यात एकही निवडणूक लढले नाहीत. लढलेच नाहीत, तर जिंकण्याचा प्रश्नच नाही. आम्हा आमदारांच्या भरवशावर ते खासदार झाले, असा टोला राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी लगावला.

यासंदर्भात राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, आम्ही जेव्हा क्रांती केली, तेव्हा संजय राऊत यांना मते मिळाली. त्यामुळे लोकनेता म्हणवून घेण्याचा अधिकार त्यांना नाही. ते लोकनेते नाहीत. केवळ आपली खासदारकी कशी मिळवत राहायची, हा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांनीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची वाट लावली आणि अजूनही ते तशीच कृत्ये करीत आहेत.

Harshvardhan sapkal : ‘त्या’ प्रवृत्तींचा आता कडेलोट करा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

भविष्यात उद्धव ठाकरे यांनी राऊतांपासून सावध राहावे. वैफल्यग्रस्त होऊन ते काहीही बोलत सुटतात. त्याचे नुकसान उद्धव ठाकरे यांना होत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना छगन भूजबळ यांना मंत्री केले होते, तेव्हा संजय राऊत तोंडाला कुलूप लावून का बसले होते, असा सवाल आशिष जयस्वाल यांनी केला.

Nationalist Congress Party : दिव्यांगांसाठी काही पण ! नागपूरच्या कोणत्याही कोपऱ्यात १५ मिनीटांत पोहोचणार !

लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार करण्यात सध्या संजय राऊत आघाडीवर आहेत. पण महाराष्ट्रात आपण जेवढ्या योजना कार्यान्वित केल्या, त्यात काही बोगस लाभार्थी सातत्याने घुसण्याचा प्रयत्न करत असतात. ही योजना जेव्हा जाहिर केली होती, तेव्हा काही निकषही जाहिर केले होते. योजनेच्या विरोधात कितीही अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला तरीही निकषांमध्ये सरकारने कुठलेही बदल केलेले नाहीत. कुठल्याही लाभार्थ्यांकडून वसुली करण्यात आलेली नाही, असे राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केले.