Eknath Shinde’s Shiv Sena MLAs complain against NCP’s Ajit Pawar : यांचे रोजचे झाले आहे, असे म्हणत लोकांची करमणूक
Aurangabad : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार अभूतपूर्व यश संपादन करत स्थापन झाले. एकीकडे विकास योजनांच्या धडाकेबाज घोषणा सुरू असताना सरकारमधील शिंदे व पवार गटामधील ‘राजी’ ‘नाराजी’ नाट्याचे प्रयोग थांबायचे नाव घेत नाहीत. यात सामान्य जनतेने मात्र चांगलेच मनोरंजन होत आहे
एकनाथ शिंदे शिवसेनेचा मोठा गट घेऊन भाजपसोबत सरकार मध्ये सहभागी झाले, आणि महाराष्ट्रात सरकार स्थिर झाले. दरम्यान शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारही एक गट घेऊन युतीत सहभागी झाले. आकडेवारी आणि यशाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार भक्कम झाले. काही काळापूर्वी बलाढ्य असलेल्या उर्वरित पक्षांची तोडफोड झाली. आणि आता त्यात गळती सत्र सुरू आहे.
The glory of a retired officer : अमरावती विद्यापीठात ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ !
महायुतीच्या भक्कम तटबंदी मध्ये मात्र शिंदे – पवार गटाची सुंदोपसुंदी सुरूच आहे. या नाट्याचे रोज नवे प्रयोग सुरू आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आमदारांतील अंतर्गत कलह कायम समोर येतो. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा मुद्दा आणखीनच चिघळला आहे. शिंदे यांच्या मंत्र्यांनी, आमदारांनी अजित पवारांची थेट तक्रार करत, आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही, असे म्हटले आहे. तर आमच्या विभागातील विकास कामांत खोडा घालण्याचे काम सुरू असल्याची तक्रार मंत्र्यांनी थेट एकनाथ शिंदेंकडे केली आहे.
शिंदेंनी पण मी स्वतः अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मार्ग काढेल, असे सांगत, मंत्री व आमदारांना दिलासा देत शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरुद्ध नाराजी व्यक्त झाल्याचे समजतात राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रमुख नेत्यांनी ‘देवगिरी’ बंगल्यावर एक बैठक घेत रणनीती ठरवली आहे.
Anti-Corruption Department : ACB चे सर्वाधिक ट्रॅप नाशिक परिक्षेत्रात !
अजित पवार महायुतीत आल्यापासून हे नाट्य सुरूच आहे. निवडणुकीतील जागावाटपापासून हे उघडपणे सुरू झाले. शिवाय दोन्ही पक्षांची सरकारमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे. काही नेते जाणीवपूर्वक नाराजी व्यक्त करून पुढील वाटाघाटीत आपली ताकद तयार करत आहेत. तर काहीजण जनतेत सहानुभूती मिळवण्यासाठी या नाटकाची भावनिक खेळी करत आहेत. असेही अनेकांचे मत आहे. महायुतीत सगळं काही अलबेल नाही, हा संदेश मात्र समाजात सारखा पसरत आहे. मात्र लोकही त्याला आता यांचे रोजचे झाले आहे, असे म्हणत करमणूक करून घेत आहेत.
#महायुती #नाराजी #राजकीयनाट्य #महाराष्ट्रराजकारण #शिंदेगट #अजितपवार #BJPShivSenaNCP #PoliticalDrama #MaharashtraPolitics #PowerGame #महाराष्ट्रराजकीयघडामोडी #ElectionAftermath #महायुतीराजकारण #CMShinde #DeputyCM #NDAAlliance #PoliticalCrisis #mahapolitics