Maharashtra Jeevan Pradhikaran : शिवसेना जिल्हाप्रमुखाचे जलवाहिनीवर अवैध कनेक्शन!

Shiv Sena district chief’s illegal connection to water pipeline : हिंगणी येथील प्रकार; जीवन प्राधिकरणाने पुरवठा केला खंडित

Akola शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी हिंगणी बु. येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (MJP) मुख्य जलवाहिनीवर १६० मिमी व्यासाचे पाण्याचे अवैध कनेक्शन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. गावातील सरपंच डॉ. कल्पना अशोक पळसपगार यांनी या संदर्भात तक्रार दिल्यानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून हे कनेक्शन नागरिकांच्या समक्ष जेसीबीच्या सहाय्याने बंद केले.

ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. मजीप्राच्या मुख्य जलवाहिनीमधून गावाला नियमित पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या अवैध कनेक्शनमुळे जलवाहिनीवरील दाब कमी होत होता आणि नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता. यामुळे ग्रामस्थांमध्येही नाराजी होती. सरपंच डॉ. पळसपगार यांनी या संदर्भात लेखी तक्रार दिल्यानंतर, प्राधिकरणाने तातडीने चौकशी केली आणि कारवाईची रूपरेषा आखली.

Amravati Airport : ‘टेक ऑफ’ ठरले! अमरावती विमानतळ 16 एप्रिलपासून सेवेत

दातकर यांनी काही दिवसांपूर्वी गावातील पाणीपुरवठा अनियमित असल्याचा मुद्दा उपस्थित करत अभियंत्यांसोबत वाद घातला होता. त्यातून अकोट ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मजीप्रातर्फे करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या मालकीच्या प्लॉटवरून मुख्य जलवाहिनीशी थेट जोडलेले १६० मिमी व्यासाचे मोठ्या क्षमतेचे कनेक्शन आढळले. यामुळे गावाचा जलदाब कमी होत असल्याचे स्पष्ट झाले. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्य कनेक्शन खंडित करून पुढील कारवाईचा इशारा दिला आहे.

या कारवाईदरम्यान गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. त्यांच्या समोरच हे कनेक्शन बंद करण्यात आले. यामुळे प्राधिकरणाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी यापुढे अशा कोणत्याही अवैध कनेक्शनवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

Accident in Wardha : पोलीस कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात चौघे ठार!

ही घटना उजेडात आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. पदावर असलेल्यांकडूनच नियमभंग होत असेल, तर सामान्य नागरिक काय उदाहरण घेणार, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. या प्रकरणात जिल्हाधिकारी व पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. चावला करण्यापेक्षा अधिक किमतीची पाणी चोरी झाली असल्याचे तक्रारीत सरपंच पळसपगार आणि नमूद केले आहे.