Vidarbha is becoming the capital of cancer, Pravin Datke expressed concern : आमदार निधीतून तरतूद करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आश्वासन
Mumbai : विदर्भात कॅन्सरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर मोठ्या प्रमाणात फोफावतो आहे. सर्वाइकल कॅन्सर एसपीव्ही नावाच्या एका वायरल वायरसमुळे होतो. दुर्दैवाने विदर्भ हा कॅन्सरची राजधानी होत चालला आहे. यावर उपाय म्हणजे लसीकरण करणे. पण जागरुकता नसल्यामुळे लोक घाबरतात. त्यामुळे या विषयात जनजागृती करून लसीकरणाची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे प्रवीण दटके यांनी लक्षवेधी सुचनेच्या माध्यमातून सभागृहाच्या लक्षात आणून दिले.
यासंदर्भात बोलताना दटके म्हणाले, कॅन्सरवरील उपचार अधिक सोपे व्हावेत तसेच व्यापक जनजागृती मोहीम हाती घ्यावी, यासाठी नितीन गडकरींसोबत कॅन्सर ग्रस्तांकरिता कामाला सुरुवात केली होती. नागपुरात रुपा राय नावाच्या नगरसेविका होत्या. त्यांनी ब्रेस्ट कॅन्सरकरिता पहिल्यांदा CSR मार्फत निधी आणला आणि 5000 भगिनींना लस देण्यात आली. नागपुरातील 20 हजार मुलींना लस देण्याचे काम नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पूर्ण झालं.
ब्रेस्ट कॅन्सर हा जेनेटिक होतो किंवा राहणीमान आणि खानपानातील विसंगती यामुळे वाढत आहे. तसेच सर्वाइकल कॅन्सर एसपीव्ही नावाच्या एका वायरल वायरसमुळे होतो. या दोन्हीकरीता लस महत्त्वाची आहे. वय वर्ष ९ ते १६-१७ वर्षापर्यंत मुलींना देण्याचा प्रघात आहे. पण जागरूकता नसल्यामुळे नागरिक घाबरतात. याकरता लोक जागरणाची गरज आहे. त्यासाठी शासन जागृती करणार का असा प्रश्न दटके यांनी विचारला.
सगळ्या योजनांमध्ये पहिले जे पेट स्कॅन करावं लागतं ते मोफत नाही. त्याच्याकरताच पहिल्यांदा 25 हजार रुपये लागतात. त्यामुळे किमान पेट स्कॅनची सुविधा सरकारी हॉस्पिटलमधून करून द्यावी. तसेच आमदार निधीमधून कॅन्सरची लस देण्याकरिता प्रावधान करण्याची तरतूद करावी, अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली. कॅन्सर हॉस्पिटल करिता ७२ कोटी रुपयांची काम मंजूर झाली. आजपर्यंत तीन वर्षात 15 कोटी आले. विशेषतः महिलांच्या कॅन्सरसाठी हॉस्पिटल करावे, अशी विनंती दटके यांनी केली. नगरपरिषद आणि महानगरपालिका आहेत, त्यांच्याही बजेटमध्ये कॅन्सर करता विशेषतः भगिनींकरता मातांकरिता निधीचे आरक्षण ठेवावं अशीही विनंती दटके यांनी केली.
Maharashtra Legislative Assembly Monsoon Session : गोवंशाचे मुंडके कापून फेकले, प्रवीण दटके आक्रमक !
महानगरपालिकांच्या आस्थापनांमध्ये असणारे सगळे हॉस्पिटल्स मिळून मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली एक बैठक लावण्यासाठी आम्ही विनंती करतोय. ते स्वतः सकारात्मक आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळ्या सुविधा आणि महात्मा फुले जीवनदायी योजनेतील वेगवेगळ्या योजनांचा आधार घेऊन लोकांना अधिक सुविधांसाठी धोरण तयार करत आहे, असे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी उत्तरात सांगितले. आमदार निधीच्या बाबतीत वित्तमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून विशेष बाब म्हणून आमदार निधीतून लस देण्याबाबत चर्चा करू आणि नागपूरसाठी आवश्यक ते प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू, असे आश्वासन प्रकाश आबिटकर यांनी दिले.