Maharashtra politics : राज्यात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू

Chandrakant Patils criticism of the Shaktipith movement : ‘शक्तिपीठ’ आंदोलनावर चंद्रकांत पाटील यांची टीका

Sangli : राज्यात काही घडलं की सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जातो, आणि त्यामुळे अराजकता पसरवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगलीत आयोजित ध्वजारोहण सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

शक्तिपीठ महामार्गाला वाढत चाललेल्या विरोधाबाबत विचारले असता पाटील म्हणाले, “जर कोयना धरण झालं नसतं तर आज महाराष्ट्राला वीज आणि शेतीसाठी पाणी मिळालं नसतं. समृद्धी महामार्ग झाला नसता तर विकास थांबला असता. शक्तिपीठ महामार्ग हा वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता आहे. बाधित शेतकऱ्यांना योग्य भरपाई आणि पुनर्वसन मिळालं पाहिजे. त्यामुळे विरोध थांबवून चांगली भरपाई मिळवण्यावर लक्ष केंद्रित करावं.

Court action ; 10 हजार रुपये वसूल करण्याचे आदेश !

 

शक्तिपीठ महामार्गासाठी सध्या जमीन संपादन प्रक्रिया सुरू आहे. हा महामार्ग 12 जिल्ह्यांतून जाणार असून, 371 गावांतील 8024 हेक्टर जमीन संपादित होणार आहे. त्यापैकी 7625 हेक्टर खाजगी जमीन शेतकऱ्यांची, 262 हेक्टर शासकीय जमीन आणि 123 हेक्टर वनक्षेत्राचा समावेश आहे.

Local body elections ! युती झाली किंवा नाही झाली तरी 100 पार !

वर्धा, यवतमाळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत संयुक्त मोजणी प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे, तर सोलापूरमध्येही प्रगती समाधानकारक आहे. मात्र नांदेड, हिंगोली, परभणी, बीड आणि धाराशिव येथे गती कमी आहे. लातूर, सांगली आणि विशेषतः कोल्हापूरमध्ये जमिनीच्या मोजणीला तीव्र विरोध होत असल्याने प्रक्रिया अत्यंत संथ आहे. अद्याप जमिनीसाठीचा मोबदल्याचा सूत्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही.

___