Mahavikas Aghadi : ‘मविआ’चे बुलढाण्यात हल्लाबोल आंदोलन

Demand to repeal the Public Safety Act : जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी, शरद पवार गटाने केले नेतृत्व

Buldhana राज्य व केंद्र सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडी (मविआ) रस्त्यावर उतरली आहे. बुलढाणा जिल्ह्यात १० सप्टेंबर रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.

मविआ कार्यकर्त्यांनी या निदर्शनात जोरदार घोषणाबाजी करत सरकारवर हल्लाबोल केला. “जनसुरक्षा कायदा हा जनविरोधी असून तो लोकशाहीविरोधी आहे. सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हा अन्यायकारक कायदा तात्काळ मागे घ्यावा,” अशी मागणी आंदोलनादरम्यान नेत्यांनी केली.

Mahavitaran : भर पावसाळ्यात झाले ‘इमर्जन्सी लोडशेडींग’!

जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्येही काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन झाले. या आंदोलनातून सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.

Shashikant Shinde : सत्ताधाऱ्यांच्या अवास्तव खर्चामुळे राज्य कर्जबाजारी

२ ऑक्टोबर गांधी जयंतीला जेलभरो आंदोलन उभारण्याचा इशाराही मविआच्या नेत्यांनी दिला. या निदर्शनात माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार रोहिणी खडसे, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, राष्ट्रवादीचे नरेश शेळके यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.