Negligence will not be tolerated in the distribution of crop loans : पालकमंत्र्यांच्या बँकांना सूचना; खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
Buldhana खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात असताना, पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज मिळावे, यासाठी सर्व बँकांनी सक्रिय भूमिका घ्यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले.
नियोजन भवन येथे पार पडलेल्या खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार किरण सरनाईक, संजय गायकवाड, चैनसुख संचेती, मनोज कायंदे, धीरज लिंगाडे, श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, सीईओ गुलाब खरात, जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, कृषी अधीक्षक मनोज ढगे आदी उपस्थित होते.
Heavy rain : अतिवृष्टी नसतानाही पूर आल्यास अधिकारीच राहणार जबाबदार !
पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, ‘खरीप हंगामात १.५६ लाख शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांचे पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र आजअखेर केवळ ११० कोटी रुपयांचेच कर्ज वितरित झाले आहे. त्यामुळे पात्र अर्जांवर त्वरीत मंजुरी देऊन निधी वितरित करावा. एकही पात्र शेतकरी कर्जवंचित राहता कामा नये.’
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांबरोबर फळबाग, भाजीपाला व बिजउत्पादन यास प्राधान्य द्यावे. कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचे नियोजन करावे. ई-केवायसी व ॲग्रीस्टक नोंदणीही आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी ती तातडीने पूर्ण करावी.
जिल्ह्यात यंदा ७.४१ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होणार असून, त्यापैकी ५८ टक्के क्षेत्रावर सोयाबीन, २५ टक्के क्षेत्रावर कापूस लागवड होणार आहे. अन्य क्षेत्रावर तूर, मुग, उडीद, मका, ज्वारी यांची लागवड होईल. बियाणे व खताचा साठा समाधानकारक आहे. टंचाई भासणार नाही, असे बैठकीत स्पष्ट झाले.