Breaking

Mangalprabhat Lodha : सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रात उभारणार जागतिक कौशल्य केंद्र!

Skill Development Minister Mangal Prabhat Lodha’s discussion with Singaporean Consul : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरच्या वाणिज्य दूतांसोबत चर्चा

Mumbai : महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देऊन, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जगभरात रोजगाराची द्वारे खुली व्हावीत, या उद्देशाने कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या दृष्टीनेच कौशल्य विभागाच्यावतीने सिंगापूरच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जागतिक कौशल्य केंद्र उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या अनुषंगाने काल (३ एप्रिल) कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सिंगापूरचे वाणिज्यदूत ओंग मिंग फुंग यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यास लवकरच महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाच्या ट्रेड्सचे प्रशिक्षण सुरू करण्यात येईल, असे यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी स्पष्ट केले. सिंगापूरचे वाणिज्य दूत ओंग मिंग फुंग यांनी या बैठकीत राज्यातल्या विविध भागांत सुरू असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रमाची माहिती घेतली.

Ajit Pawar : ऊसतोडणी मुकादमांकडून शेतकरी व मजुरांची होणारी फसवणूक थांबणार !

कौशल्य विभागाच्यावतीने सुरू असलेल्या केंद्राबाबत फुंग यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण देण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. या बैठकीला व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका श्रीमती माधवी सरदेशमुख, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनावणे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धवसे या बैठकीला उपस्थित होते.

बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रकल्पात प्रशिक्षणाची संधी..
जगभरातल्या उद्योगात आवश्यक असलेल्या कौशल्य अभ्यासक्रमाचा सिंगापूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल एज्युकेशन सर्व्हिसेस ( ITEES ) या संस्थेत समावेश असतो. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये प्रत्यक्ष कामाची संधी आहे. तिथले आधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक तंत्रज्ञान, AI तंत्रज्ञान तसेच औद्योगिक व्यवस्था आणि सेवा याबाबतच्या प्रशिक्षणाची संधी या उपक्रमामुळे महाराष्ट्रातल्या युवकांना मिळणार आहे.

Anant Gadgil : गुगली ट्रम्प यांची, विकेट मोदी सरकारची:- अनंत गाडगीळ

लवकरच सामंजस्य करार..
सिंगापूरच्या जागतिक कौशल्य केंद्राच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जगभरातील रोजगाराच्या संधीचे दरवाजे खुले होतात. याच अनुषंगाने महाराष्ट्रातल्या युवकांना जागतिक स्तरावर संधी निर्माण करण्याचा प्रयत्न कौशल्य विकास विभागाचा आहे. सिंगापूरचे वाणिज्य दुत ओंग मिंग फुंग यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार आहे, असेही मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.