Breaking

Manikrao Kokate : अखेर माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केली दिलगीरी !

Revenue Minister Chandrashekhar Bawankule had tried to salvage the situation : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता बाजू सावरण्याचा प्रयत्न

Nashik : ‘शेतकरी कर्ज घेतात आणि पुढील पाच-दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहतात. कर्जमाफी झालेल्या पैशाचे काय करता? त्या पैशांतून एका रुपयाची तरी गुंतवणूक शेतीत करता का? त्या पैशांतून साखरपुडे करा, लग्न करा..’, असे वक्तव्य कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले होते. आता या वक्तव्याबद्दल माफी मागण्याची वेळ त्यांच्यावर आली.

कृषी मंत्री कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विरोधक त्यांच्यावर तुटून पडले होते. सरकारवरही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आसुड ओढले होते. ‘गांजा, दारू पिऊन कोकाटेंनी बोलू नये. कोकाटे हा कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा आहे’, असे म्हणत प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी त्यांच्यावर जहरी टिका केली होती. याचवेळी काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनीही कोकाटेंवर टिका करत त्यांनी माफी मागण्याची मागणी केली होती.

Chandrashekhar Bawankule : आता निवडणूक कार्यकर्त्यांची, ५१ टक्क्यांचा संकल्प करा !

कोकाटेंच्या वक्तव्याने गदारोळ उडाल्यानंतर ‘कोकाटे जर तसं काही बोलले असतील, तर सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्यांची माफी मागू’, असे म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर कुठे माणिकराव कोकाटेंना उपरती झाली आणि त्यांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ‘मस्करीमध्ये बोललेल्या विधानामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो’, असे म्हणत त्यांनी या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Pune Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आज होणार सादर !

पुतळा जाळला..
माणिकराव कोकाटेंच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे संतापलेले कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. कोकाटेंचा प्रतिकात्मक पुतळा फासावर लटकवून त्यांचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीही नैतिकता शिल्लक असेल तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली.