Maratha protesters warn, agitation turns violent : मराठा आंदोलकांचा इशारा, आंदोलनाला उग्र रूप
Mumbai : मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु असून, तिसऱ्या दिवशी आंदोलनाचा उग्र स्वरूप पाहायला मिळत आहे. जरांगेंच्या आरक्षण लढ्याला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, आंदोलकांनी थेट इशारा दिला आहे की, “जरांगेंनी फक्त आदेश द्यावा, दीड लाख गाड्यांनी एका तासात संपूर्ण मुंबई ठप्प करू.”
दरम्यान, पावसामुळे आणि सोयीसुविधांच्या अभावामुळे आझाद मैदानावर जमलेल्या मराठा बांधवांना हाल सहन करावे लागत आहेत. तरीदेखील आंदोलनाचा उत्साह कमी झालेला नाही. उलट, बाहेरून सतत रसद आणि मदतीचा ओघ सुरू आहे.
मुंबईत ठिय्या मांडून बसलेल्या आंदोलकांचे अन्नपाण्यावाचून हाल होऊ नयेत यासाठी कळंब तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर रसद पुरवठा केला जात आहे. “एक घर – दोन भाकरी” असा साधा मेसेज व्हॉट्सअपवर फिरला आणि गावागावांतून नागरिकांनी प्रतिसाद देत अवघ्या काही तासांत तीन मालवाहू वाहने मुंबईकडे रवाना झाली.
Mudhoji Raje Bhosale : जरांगेंच्या आंदोलनाला शुभेच्छा, पण ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध !
या वाहनांत तब्बल एक क्विंटल शेंगा चटणी, सुमारे 20 हजार भाकऱ्या, बिस्किटं, औषधं आणि इतर साहित्य भरून पाठवण्यात आलं आहे. धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाले असून, त्यांच्या खाण्या-पिण्याची जबाबदारी तालुक्यातील नागरिकांनी उचलली आहे. याच प्रमाणे राज्यातील विविध भागातूनही मुंबईत मंगलकांसाठी अन्नपुरवठा केला जात आहे.
Babanrao Taywade : ४३ वर्षांनंतर मिळालेल्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही !
या लढ्याला केवळ मराठा समाजच नव्हे तर इतर समाजघटकांचाही प्रतिसाद मिळत आहे. कळंब तालुका आणि आसपासच्या भागातील मुस्लिम बांधवांनीही मदतीसाठी हात पुढे करत भाकरी-चटणीपासून आवश्यक वस्तूंपर्यंत साहित्य दिलं आहे. समाजात धर्मभेद विसरून सुरू असलेली ही रसद मोहीम आंदोलनाला अधिक बळ देत आहे.
Ashok nete: सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राची मान उंचावली !
मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला आता राज्यभरातून रसद, समर्थन आणि सहानुभूती मिळू लागल्याने लढ्याला नवा वेग आला आहे. आंदोलकांचा इशारा, रसद पुरवठा आणि समाजघटकांचा वाढता सहभाग पाहता, पुढील काही दिवसांत आंदोलन आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.








