Maratha movement : “आमचा कवडीचाही सबंध नाही”

Sharad Pawars reaction to Jaranges protest : जरांगेंच्या आंदोलनावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Nashik : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मान्य करून शासन निर्णय काढला. या जीआरला ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. दरम्यान, जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या आंदोलनाशी आमचा कवडीचाही संबंध नाही. हा आरोप सत्यावर आधारित नाही. त्यामुळे त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही.”

OBCs Vow to Protect Reservation : ओबीसी संघटनांचा १० ऑक्टोबर रोजी महामोर्चा

सरकारच्या जीआरमुळे मराठा समाजाला खरोखरच लाभ होईल का, असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, “सरकारने अ-ब-क असा विभाग न करता सर्व समाजांचा विचार करायला हवा. सरकार कुणाच्या जाती-धर्माचे नसावे, ते सर्वांचे असावे. समाजात दुरावा निर्माण न करता सामाजिक ऐक्य साधणं हीच खरी गरज आहे. कोणतीही कमिटी एका जातीपुरती न ठेवता समाजाची करा.” असा सल्ला त्यांनी दिला.

Devabhau Campaign : देवाभाऊ कॅम्पेनला ‘देवा तूच सांग’ने प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने नाशिकमध्ये रविवारी एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासंदर्भात शरद पवार म्हणाले, “नाशिकच्या सहकाऱ्यांचा आग्रह असल्याने हे शिबिर इथे ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीत तीन जागा आमच्याकडे आहेत. स्थानिक जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी हे शिबिर आयोजित केलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सरकारच्या धोरणांबाबत आम्ही मोर्चा काढणार आहोत.” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.