March by the United Tribal Community : आरक्षणाच्या रक्षणासाठी आदिवासींचा एल्गार!

Demand for Dismissal of Holders of Fake Certificates : बोगस प्रमाणपत्रधारकांना बडतर्फ करण्याची मागणी; सकल आदिवासी समाजाचा मोर्चा

Buldhana बंजारा, धनगर समाजाने अनुसूचित जमाती आरक्षणात समावेश मागितल्याच्या पार्श्वभूमीवर सकल आदिवासी समाजाने एकजुटीने “आरक्षण बचाव”चा बिगुल फुंकला आहे. या मागणीचा तीव्र विरोध करत ६ ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘आदिवासी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.

या मोर्चाद्वारे बोगस आदिवासी प्रमाणपत्रधारकांना बडतर्फ करून खऱ्या आदिवासींना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले.

Local Body Election : ११ नगर परिषदांच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा मुहूर्त निघाला!

स्थानिक जिजामाता प्रेक्षागार मैदानावर सकाळपासूनच जिल्हाभरातील आदिवासी बांधव एकत्र जमले होते. सभेत आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश सोळके, एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत पवार, महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारगे, भाजप आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष गजानन सोळके, विनोद डाबेराव, वासुदेव खुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

हैद्राबाद गॅजेट महाराष्ट्रात लागू करू नये. अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा, धनगर वा इतर जातींचा समावेश नको. आदिवासी विकास विभागाचा निधी इतरत्र वळवू नये; वळविलेला निधी व्याजासह परत द्यावा, बोगस प्रमाणपत्रधारकांना तत्काळ बडतर्फ करून खऱ्या आदिवासींची भरती करावी, छत्रपती संभाजीनगर येथे बोगस जातवैधता प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, १२,५०० अधिसंख्य व ८५,००० रिक्त पदांवरील भरती तत्काळ करावी, अश्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Sanjay Gaikwad : ‘पैसे मागणाऱ्यांची खैर गय नाही’; आमदाराचा अधिकाऱ्यांना इशारा

मोर्चात पारंपरिक आदिवासी वेशभूषा, डफ, ताशे आणि ‘एक तिर एक कमान, आदिवासी एक समान!’, ‘असा कसा देत नाही, घेतल्या शिवाय राहत नाही!’ अशा घोषणांनी शहर दणाणून गेले. काही युवकांनी खेकडे, मासे, साप, विंचू हातात घेऊन परंपरागत रीतिने प्रदर्शन करत लक्ष वेधले. शहरातील प्रमुख चौकांत पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता.