Breaking

MHADA houses : म्हाडाची १० हजार घरे बांधण्यासाठी मुनगंटीवारांच्या पुढाकारातून झाली आढावा बैठक !

 

Review meeting initiated by Sudhir Mungantiwar to build 10,000 MHADA houses : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे होणार पुढील बैठक

Chandrapur : नवीन चंद्रपूर परिसरात म्हणजे म्हाडा कॉलनीमध्ये गरिबांसाठी १० हजार घरे बांधण्याचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणचे ((MHADA) मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांना पत्र दिले होते. संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे पत्रात सुचवले होते. त्यानुसार म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासमवेत मंत्रालयात बैठक पार पडली.

रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या लोकांनाही म्हाडामध्ये घरे उपलब्ध करून देण्याचा मुद्दा आमदार मुनगंटीवार यांनी बैठकीत लाऊन धरला. सोबत पुनर्वसनासंदर्भात पाच वर्षांचे वेळापत्रक निश्चित करण्याच्या सूचना आमदार मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी रेल्वे अतिक्रमणधारकांना १०० घरे देण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे यासंदर्भात पुढील बैठक केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे होणार असल्याचे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

Railway Land Encroachment : २५ वर्षांपासून राहात असलेल्यांना बेघर करणार नाही, मुनगंटीवारांनी उचलले ‘हे’ पाऊल !

शिक्षणाच्या जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालये प्रस्तावित आहेत. यानुसार परिसरात क्रिडांगण, भूमिगत नाले आणि रस्त्यांची कामे वेगाने करण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार मुनगंटीवार यांनी या बैठकीत सांगितले. बैठकीत उपस्थित जवळपास सर्व मुद्द्यांबाबत विभाग सकारात्मक असल्याचे संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री पंकज भोयर उपस्थित होते.