Breaking

MIDC : ३६ वर्षे दुर्लक्ष केले, आता अतिक्रमण हटविले!

Encroachment on 53 acres of land removed : एमआयडीसीचा ५३ एकर भूखंड मोकळा, झोपड्या हटवण्यासाठी पोलिस बंदोबस्तात कारवाई

Buldhana मेहकर शहराजवळील खामखेड रस्त्यालगत औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) दिलेल्या ५३ एकर जागेवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई पोलिस बंदोबस्तात सुरू झाली होती. तीन दिवसात अतिक्रमण काढण्यात आले. गेल्या ३६ वर्षांत एकाही उद्योगास प्रारंभ न झाल्याने या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण करून शेती केली. तसेच झोपड्या उभारल्या होत्या.

१९८९ मध्ये गट क्र. ४०/२, ५३ व ५४ मधील २१.२७ हेक्टर जमीन (सुमारे ५३ एकर) एमआयडीसीकडे सुपूर्त करण्यात आली होती. सुरुवातीला काही थातुरमातुर सुविधा जसे की पाण्याची टाकी, अर्धवट रस्ते व अपूर्ण पाइपलाइन उभारण्यात आल्या. मात्र, यानंतर कोणताही विकास न झाल्याने जागा रिकामी राहिली आणि अतिक्रमणास पोषक ठरली. रिकाम्या जागेत काही लोकांनी शेती सुरू करून विविध पिके घेतली. काहींनी या जमिनीवर झोपड्याही उभारल्या. काहीजणांनी शासकीय नोंद न करता वहिती करून घेतल्याची माहितीही समोर आली आहे.

Cooperative credit society : ८० कोटी रुपयांचे बोगस वाटप, वणीतील रंगनाथ स्वामी पतसंस्थेत चाललंय तरी काय ?

७ ते ९ मे या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. खामगावचे डेप्युटी इंजिनीअर युनिक धुर्वे, अनुलेखक दिगंबर वाकोडे आणि भूमापक बी.एस. राठोड यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम राबवण्यात आली. विशेष म्हणजे ५७ पोलीस कर्मचारी, २० मजूर, जेसीबी, ट्रॅक्टर, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाचा ताफा तैनात करण्यात आला होता.

या अतिक्रमणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर प्रशासनाने हालचाल सुरू केली. यामुळे एमआयडीसी अखेर जागे झाले आहे. अतिक्रमण हटवल्यानंतर संपूर्ण जागेला तार फेन्सिंग करण्यात आले आहे.

MLA Sulbha Khodke : एनएचएआय अधिकाऱ्याचा मनमानी कारभार, आमदारांचा संताप

मूलभूत सुविधांची पूर्तता न झाल्याबद्दल विचारले असता एमआयडीसीचे अधिकारी मात्र उत्तर देऊ शकले नाहीत. सध्या पथदिवे बसवण्याचे काम सुरू असून बोअरवेल खणणे, तसेच रस्त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.