Minister Dada Bhuse : शिक्षणमंत्र्यांच्या दौऱ्याचा इफेक्ट! डेस्क-बेंचसाठी अडीच कोटींचा प्रस्ताव

 

2.5 crore proposal for school desk-bench : शिक्षण विभाग अचानक झाला सक्रीय

Nagpur शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नागपूर दौऱ्यानंतर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अचानक सक्रिय झाला आहे. विभागाकडून डेस्क-बेंच खरेदीचा अडीच कोटींचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची प्रतिक्षा आहे. मात्र कमीत कमी पुढील शालेय सत्र सुरू होईपर्यंत वर्गखोल्यांमध्ये बेंच पोहोचतील का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

जिल्ह्यात एकूण तीन हजार ९७५ शाळा आहेत. यामध्ये शहरी भागात यूआरसीअंतर्गत प्राथमिक ६८०, यूआरसी दोन अंतर्गत माध्यमिकच्या ५२० व यूआरसी तीन ते पाचअंतर्गत जिल्हा परिषद, नागपूर महापालिकेच्या १२४ वर शाळा आहेत. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या सुमारे १५११ व उर्वरित सर्व माध्यमांच्या शाळा आहेत. दादा भुसे यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान शाळांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते.

BJP Membership : गोंदिया भाजपवर राज्यातील नेते खुश!

जिल्हा परिषदेच्या शाळा दुर्गम व ग्रामीण भागात आहे. येथे अत्यंत गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेतात. त्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा खर्च होतो. खासगी शाळांच्या धर्तीवर शासकीय शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करण्यासाठी साहित्य खरेदीवर अधिक भर दिसून येत आहे.

Traffic Police RTO : देशभरात कुठेही जा! या वाहनांना कोणी अडवत नाही!

मागील वर्षी जिल्हा नियोजनच्या निधीतून हे साहित्य किमान ३५ पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना पुरविण्यात आले होते. प्रत्येक तालुक्यातील १३० शाळांत १९०० डेस्क-बेंचचा पुरवठा करण्यात आला होता. कंत्राटदाराने विलंबाने पुरवठा केल्यामुळे संपूर्ण खरेदी प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. आता पुन्हा शिक्षण विभागाने दोन कोटी ५१ लाखांच्या निधीतून शाळांसाठी डेस्क-बेंच खरेदीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. निधी प्राप्त होताच खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.