MLA Sanjay Gaikwad : नगरपालिकेच्या शाळांमध्ये आता CBSE पॅटर्न!

CBSE pattern now in municipal schools : गरिबांच्या मुलांनाही मिळणार दर्जेदार शिक्षण; राज्य सरकारचा निर्णय

बुलडाणा: मजूर व गरीबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकेच्या शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता इतर मोठ्या शाळांप्रमाणेच कष्टकरी कुटुंबातील मुलांना देखील उत्तम शिक्षण मिळणार आहे.

बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने हा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर आता नगरपालिकेच्या शाळेत लागू केलेल्या CBSE पॅटर्नला राज्यभर विस्तार करण्यास शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मंजुरी दिली आहे. येत्या १ एप्रिलपासून या पॅटर्नची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Prashant Dikkar : पाच लाख द्या, सरकारकडून ४० लाख मिळवून देतो!

आमदार गायकवाड यांच्या या प्रयत्नामुळे मजूर, शेतकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बुलडाण्यातील नगरपालिका शाळांमध्ये या पॅटर्नची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांना स्वतंत्र वाहतूक सुविधा, आवश्यक पुस्तके आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे अनेक गरीब आणि शेतकऱ्यांची मुले इंग्रजीत आत्मविश्वासाने बोलू लागली आहेत.

दिल्लीतील तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील शाळांमध्ये CBSE पॅटर्न लागू करण्याचा यशस्वी प्रयोग पहिल्यांदा झाला होता. त्यानंतर बुलडाण्यातील नगरपालिकेच्या तीन शाळांमध्ये हा पॅटर्न यशस्वीपणे राबवण्यात आला. आता राज्यभरात सर्व पालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही हा पॅटर्न लागू केला जाणार आहे.

Sudhir Mungantiwar : आणीबाणीत कारावास भोगणाऱ्यांचा सन्मान निधी वाढवा!

या निर्णयामुळे एक उत्तम कल्पना प्रत्यक्षात उतरला आहे. राज्यातील गरीब, मजूर आणि शेतकरी वर्गातील पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली असून येत्या काही दिवसांत सर्व शाळांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.