MLA Shweta Mahale : शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांमधून गृहकर्ज द्या!

 

Provide home loans to farmers from nationalized banks : शेतकऱ्यांचे घरकुल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

Buldhana चिखली मतदारसंघातील सामान्य नागरिकांच्या जीवनावश्यक प्रश्नांवर विधान भवनात आमदार श्वेता महाले आक्रमक झाल्या. अर्थसंकल्प 2025-26 च्या अनुदानाच्या मागण्यांवर बोलताना त्यांनी शेतकरी, शहरी गरीब आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली.

ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेताजवळ घर बांधू इच्छितात, मात्र 8 अ उताऱ्यावरील जमीन “एन.ए.” नसल्याने राष्ट्रीयीकृत बँका गृहकर्ज देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना सावकारी कर्जाच्या जाळ्यात अडकावे लागते. शेतकऱ्यांना हक्काचे घर मिळावे आणि सावकारी कर्जातून सुटका मिळावी, यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी गृहकर्ज देण्याचे निर्देश शासनाने द्यावेत, अशी आग्रही मागणी महाले यांनी केली.

MLA Shweta Mahale : आता तरी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवा!

बुलढाणा आणि चिखली शहरांचा झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती घरांची मागणी लक्षात घेता, कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी सिडको किंवा म्हाडाच्या माध्यमातून परवडणाऱ्या किमतीत सदनिका उपलब्ध करून देण्याचे महाले यांनी सुचवले. या उपक्रमामुळे प्रत्येकाला हक्काचे घर मिळण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले.

MLA Shweta Mahale : अवैध गर्भलिंग तपासणी करणाऱ्यांना जामीनच मिळू नये

राज्यातील आरोग्य निरीक्षकांची वेतनश्रेणी S-9 वरून S-13 करण्याची मागणी महाले यांनी केली. दोन वेगवेगळ्या पदांवर समान वेतनश्रेणी देणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांचा इंधनभत्ता 1,500 रुपयांवरून 5,000 रुपये करण्याची मागणी केली, ज्यामुळे लसीकरण व आरोग्य सेवेसाठी प्रवास सुलभ होईल.

Shweta Mahale : आमदार श्वेता महाले यांना धमकी; चिखलीत रास्ता रोको

चिखलीतील उपजिल्हा रुग्णालयात “रेडिओलॉजी” विभाग नसल्याने रुग्णांना खाजगी दवाखान्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अपव्यय होतो. सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि एक्स-रे युनिटसह आवश्यक मनुष्यबळ आणि वैद्यकीय साधने तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी महाले यांनी केली.