Will not tolerate laxity in development work : अधिकाऱ्यांना खडसावले; चिखली शहरातील विकासकामांची पाहणी
Buldhana चिखली मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत आमदार श्वेता महाले यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत खडसावले. विकासकामांत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, या शब्दांत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी संबंधितांनी प्रत्यक्ष लक्ष घालावे, असे निर्देशही त्यांनी दिलेत.
महाले यांनी सभागृह, प्रशासकीय इमारतींसह विविध प्रकल्पांची पाहणी
केली. नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण कामांचाही आढावा घेतला. यामध्ये स्व. दयासागर महाले सांस्कृतिक भवन, नवीन विश्रामगृह, मुख्य प्रशासकीय इमारत, तसेच इतर नागरी सुविधा प्रकल्पांचा समावेश होता.
विशेषतः स्व. दयासागर महाले सांस्कृतिक भवन हे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सभागृहांपैकी एक ठरणार असून, त्यात कुठलाही दोष राहू नये यासाठी त्यांनी सूचनाही दिल्या.
या दौऱ्यात मागील आर्थिक वर्षात मंजूर झालेली, सुरू असलेली व पूर्ण झालेली कामे, त्यांच्या गुणवत्तेचा दर्जा आणि त्यातून जनतेला मिळणाऱ्या सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक काम वेळीच पूर्ण व्हावे, गुणवत्तेत तडजोड होऊ नये आणि निधीचा योग्य वापर व्हावा यावर आमदार महाले यांनी भर दिला.
Vidarbha Farmers : अवकाळी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करा
पाहणीदरम्यान तहसीलदार संतोष काकडे, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पंडितराव देशमुख, सुरेंद्रप्रसाद पांडे, सुहास शेटे, युवराज भुसारी, महेश लोणकर, शेख अनिस, गोविंद देव्हडे, शैलेश बाहेती, सागर पुरोहित, संजय गाडेकर आदींचा समावेश होता.