Breaking

MLA Siddharth Kharat : पालखी मार्ग नव्हे, मृत्यूचा सापळा!

Corruption in the construction of Shegaon-Pandharpur road : नव्या कोऱ्या रस्त्यावर पडल्या भेगा, भ्रष्टाचार झाल्याचा आमदाराचा आरोप

Buldhana शेगाव-पंढरपूर पालखी मार्गावर लोणार-मेहकर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगांमुळे प्रवाशांसाठी हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे वारकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काम सुरळीत न केल्यास २ जूनपूर्वी या रस्त्यावर आंदोलन करण्याचा इशारा लोणार-मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला आहे.

आमदार खरात यांनी पालखी मार्गाची पाहणी केली. २०१७ मध्ये लोणार ते जानेफळ या ३४ किलोमीटरच्या पालखी मार्गासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून वारकऱ्यांच्या सोयीसाठी हा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम पूर्ण न झाल्यामुळे आणि नीट नियोजन न केल्यामुळे मार्गावर ६ ते १० इंच खोल, २० ते २५ फुट लांब भेगा पडल्या आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घेऊन चालावे लागते. या भेंगांमुळे अनेक अपघातही झाले आहेत, असं ते म्हणाले.

RTO Department : पुसद येथे आरटीओ कॅम्पमध्ये तीन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात !

पालखी मार्गाचे काम श्रीहरी कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतले होते. परंतु त्यांनी काम अर्धवट सोडले आणि दुसऱ्या कंपनीला दिले. या प्रकाराचा सखोल तपास करून या कंपन्यांवर कठोर कारवाई होण्याची मागणी आमदार खरात यांनी केली आहे. अल्पावधीतच रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे, भेगा पडल्या आहेत. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पालखी मार्ग प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनला आहे, अशी खंत आमदारांनी व्यक्त केली.

Chandrashekhar Bawankule : पुस्तकाचं नाव चुकलं, ‘नरकातला राऊत’, असं पाहिजे होतं !

वारकऱ्यांच्या नावाने लोकप्रिय घोषणा करून बोगस कामे करणं खपवून घेतलं जाणार नाही. २ जूनला पंढरीच्या वारीसाठी वारकरी निघणार आहेत. त्यापूर्वी या मार्गाची दुरुस्ती न केल्यास वारकरी व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह मोठं आंदोलन करून हा मार्ग बंद पाडण्यात येईल, असा इशारा खरात यांनी दिला आहे.