Breaking

MSRTC : एसटीच्या सवलतींचा प्रवाशांना मोठा लाभ; पण महामंडळाचे कंबरडे मोडले

MSRTC waiting for more than Rs 40 crore from the government : ४० कोटींहून अधिक रक्कम शासनाकडे थकीत; आर्थिक अडचणीत सापडले

Amravati राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बससेवेतील विविध सवलतींचा प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला असला, तरी या सवलतीपोटी शासनाकडून सुमारे ४० कोटी ५६ लाख ८७ हजार रुपये थकीत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळ आर्थिक अडचणींना सामोरे जात आहे.

गत जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत अमरावती विभागात सुमारे १ कोटी १४ लाख ६४ हजार ३०३ प्रवाशांनी सवलतीच्या दरात एसटीने प्रवास केला आहे. यात सर्वाधिक लाभ अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून घेतल्याचे दिसते. या योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटी प्रवास पूर्णतः मोफत दिला जातो.

महामंडळाच्या माहितीनुसार, ६५ ते ७५ वयोगटातील ११ लाख १२ हजार ३१३, तर ७५ वर्षांवरील ३३ लाख ११ हजार ४६० ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. याशिवाय ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत ७० लाख ४० हजार ५३० महिलांनी सवलतीचा लाभ घेतला. एकूण मिळून १ कोटी १४ लाखांहून अधिक प्रवाशांनी या योजना वापरल्या आहेत.

Devendra Fadnavis : संत्रा उन्नती प्रकल्पाचे काय? आठ वर्षांनंतरही फक्त वचनपूर्तीची प्रतीक्षा!

राज्य परिवहन महामंडळ विविध घटकांसाठी सवलतीच्या योजना राबवते. यात विद्यार्थी, विद्यार्थीनी, दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक, पुढारी इत्यादींचा समावेश होतो. या सवलतींमुळे एसटीच्या प्रवासास पुन्हा एकदा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.

Dancebar case : तुमच्या खानदानाचा व्यवसाय काय? ‘ कोहिनूर’चा हिशेब सांगा !

या सवलतींमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असला तरी शासनाकडून मिळणारी रक्कम वेळेवर न मिळाल्यामुळे महामंडळाला आर्थिक नियोजन करताना अडचणी येत आहेत. विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी सांगितले की, “या सवलतीपोटी शासनाकडून ४० कोटी ५६ लाख रुपयांची रक्कम अजूनही मिळालेली नाही. शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.”