Nagpur Congress नागपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये फूट; सहा पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Six office bearers of Congress entered in BJP Nagpur : विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये वाताहत

Nagpur विधानसभा निवडणुकीनंतर राज्यपातळीवर महाविकासआघाडीत विसंवाद दिसून येत आहे. असे असताना आता नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या यशानंतर जिल्ह्यातील स्थिती मजबूत झाली होती. मात्र, विधानसभेतील पराभवानंतर पुन्हा एकदा काँग्रेसची वाताहत होऊ लागली आहे. अनेकांनी भाजपचा मार्ग निवडल्याचे चित्र आहे.

उमरेड पंचायत समितीच्या सभापती गीतांजली नागभीडकर आणि उपसभापती सुरेश लेंडे यांच्यासह भिवापूर पंचायत समितीचे उपसभापती राहुल मसराम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. आणखी काही पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Beed Case वाल्मिक कराडवर अखेर मकोका; एसआयटीने घेतलं ताब्यात

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत व माजी आमदार राजू पारवे यांच्या नेतृत्वात उमरेड मतदारसंघातील सहा प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात उमरेड पं. स. सदस्य दादाराव मांडसकर, प्रियंका लोखंडे, उमरेड बाजार समितीचे संचालक भिकाजी भोयर यांचाही समावेश आहे. जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसची सत्ता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत. अशावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी भाजपचा मार्ग धरल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे.

भाजपकडून महाविकास आघाडीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. विधानसभा निवडणूकीअगोदरच अनेकांशी संपर्क करण्यात आला होता. मात्र निवडणूकीपर्यंत थांबण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. निवडणुकीत जिल्ह्यातील बहुतांश जागांवर मविआच्या तीनही पक्षांत समन्वय नसल्याचे चित्र दिसले होते. तर काँग्रेसमधील गटबाजीचे राजकारण प्रकर्षाने समोर आले होते. याच गटबाजीतून काँग्रेसमधील नाराजांचे आऊटगोईंग सुरू झाल्याची चर्चा आहे.

Local Body Elections : पटोलेंची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून गच्छंती ?

निवडणुका तोंडावर असताना
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसला लागलेली गळती धोकादायक मानली जात आहे. एकीकडे विधानसभेच्या पराभवातून बाहेर पडण्याचे आव्हान काँग्रेस नेत्यांपुढे आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधून अनेक पदाधिकारी व नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे.