Breaking

Nagpur crime : प्रेयसीच्या चितेवर उडी मारणारा तरुण अत्यावस्थ!

thrill of end of love at Shanti Ghat Kanhan River : कन्हान नदीच्या शांती घाटावर प्रेमाच्या अंताचा थरार

Nagpur : आत्महत्या केलेल्या तरुणीच्या विरहात अंत्यसंस्काराच्या वेळी तिच्या चितेवर उडी घेऊन जीवन संपवायचा प्रयत्न प्रियकाराने केला. उपस्थितांनी त्याला चांगलाच झोप देत रोखले. प्रेम प्रकरणाचा हा धक्कादायक थरार कन्हान नदीच्या शांती घाटावर समोर आला. या घटनेतील त्या तरुणाची प्रकृती सध्या अत्यावस्थ आहे. या घटनेवरून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

प्रेमभंगाच्या वेदनेत विव्हळलेल्या तरुणाने थेट प्रेयसीच्या चितेवर उडी मारून स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. मात्र उपस्थितांनी प्रसंगावधान राखत त्याला रोखले. तो एकाच्या मनस्थितीत नव्हता शेवटी त्याला चांगलाच चोप देत शांत केले. तेव्हा त्याची शुद्ध हरपली. हा प्रकार करण्यापूवी त्याने कोणतेतरी द्रव्य पिले असावे असा संशय व्यक्त केला जात आहे.
या सगळ्या प्रकारात तो तरुण गंभीर जखमी झाला असून सध्या तो आयसीयूमध्ये अत्यावशता अवस्थेत उपचार घेत आहे.

Nagpur Municipal Corporation : काय सांगता? नागपूर महानगरपालिकेचं कौतुक होतयं?

मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग मेश्राम असं त्या तरुणाचे नाव आहे. अनुरागचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र अलीकडे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. यात त्या तरुणीला नैराश्य आलं आणि तिने आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या तरुणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सोमवारी सायंकाळी 4 वाजता कन्हान नदीच्या शांती घाटावर तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होते. त्यावेळी अनुराग मेश्राम हा घटनास्थळी आला. भावनेच्या भरात त्याने प्रेमिकेच्या मृतदेहावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपस्थित लोकांनी त्याला रोखले आणि जबर मारहाण केली. या मारहाणीत तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याचे वडील राजेंद्र मेश्राम आणि मोठा भाऊ पवन मेश्राम यांनी पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल केले.

Vishwas Utagi : ज्यांच्या खांद्यावर देश उभा आहे, त्यांच्याच खांद्यावर ओझं का?

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यांचे पथक घटनास्थळी पोचले त्यांनी तेथे पाहणी केली. अनुराग मेश्राम सध्या अत्यावस्था अवस्थेत उपचार घेत आहे. तो शुद्धीवर आल्यावर पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • सचिन काटे (विशेष प्रतिनिधी)

    २७ वर्षांपासून विविध राज्यस्तरीय दैनिकांमध्ये रिपोर्टरपासून कार्यकारी संपादक पर्यंतचा विस्तृत अनुभव. डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात ही यशस्वी योगदान.