66 slums in Nagpur are in danger zone : ६६ झोपडपट्ट्या नाल्याच्या काठावर, संरक्षक भिंतही नाही
Nagpur मुसळधार पावसाने अनेकवेळा नागपूर महानगरपालिकेचे पितळ उघडे पाडले आहे. गेल्या पंधरा वर्षांत तर महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाची प्रचिती वारंवार आली आहे. आता तर शहरातील ६६ झोपडपट्ट्या संरक्षक भिंतीशिवाय नाल्याच्या काठावर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे एक मुसळधार पाऊस आला तर हजारो लोक वाहून जातील, अशी स्थिती आहे.
शहरात मान्सून दाखल झाला असताना अद्याप महानगरपालिकेची तयारी झाली नसल्याचे वास्तव आहे. त्यातच शहरातील तब्बल ६६ झोपडपट्ट्यांना मुसळधार पाऊस झाल्यास पुराचा धोका निर्माण झाला आहे. मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानेच ही माहिती दिली आहे. त्यामुळे पावसाळ्यात मनपासमोरील आव्हाने वाढणार असल्याचेच चित्र आहे.
Chandrashekhar Bawankule : नुकसानाचा काटेकोर अहवाल तयार करा, कुणीही वंचित राहायला नको
पावसाळ्यात ६६ झोपडपट्टयांमधील हजारो रहिवाशांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. आजही अनेक नाल्यांना संरक्षक भिंत नाही. काही नाल्यांच्या संरक्षक भिंती तुटलेल्या आहेत. काही वस्त्या अगदी खोलगट भागात आहेत. अलीकडेच बांधण्यात आलेले सिमेंट रस्ते उंच झाल्यानेही पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. त्यामुळे या वस्त्यांमधील नागरिकांना पाऊस आल्यानंतर भीतीने रात्र जागून काढावी लागत आहे.
दरवर्षी या झोपडपट्ट्या तसेच वस्त्यांमध्ये पाणी शिरते. महापालिकेकडून नुकताच पूरस्थितीवर नियंत्रणासाठी उपाययोजना घोषित करण्यात आल्या. त्यात केवळ अतिवृष्टीच्या काळात या नागरिकांना समाजभवन किंवा शाळांमध्ये ठेवण्यापलीकडे काहीच नाही. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने याची नोंद केली आहे. त्याचबरोबर शेकडो वस्त्यांमध्येही पाणी साचत असल्याची नोंद आहे. शहर स्मार्ट करताना पावसाळ्यात पुराचा धोका असलेल्या वस्त्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात झोपडपट्ट्यांमधील घरांतील साहित्य, धान्याचे नुकसान होत असते.
Bodhgaya agitation starts from Nagpur : बोधगया महाविहार मुक्तीसाठी जीव गेला तरी बेहत्तर
शहरातील संजय गांधीनगर, इंदिरा मातानगर, धम्मदीपनगर, पंचशीलनगर, आदर्शनगर, पिवळी नदी झोपडपट्टी, ताजनगर, हिवरेनगर, धनगरपुरा, सेवानगर, कुंभार टोली, सावित्रीबाई आंबेडकरनगर, शिवनगर, सुदामनगर, राजीवनगर, संजयनगर, अमरनगर, टीव्ही टॉवर, इंदिरा गांधी झोपडपट्टी, संघर्षनगर, नेहरूनगर, हत्तीनाला, चंद्रनगर, काशीबाई देऊळ, धम्मनगर, अंसारनगर, गार्ड लाईन, भांडे प्लॉट, राणी भोसलेनगर, रघुजीनगर, ताजबाग, नंदनवन, चंदननगर, हसनबाग, वसंतराव नाईक झोपडपट्टी, काचीपुरा, दंतेश्वर झोपडपट्टी, फुलेनगर, सुभाषनगर,, आझादनगर मानकापूर, मोतीबाग, ज्योतीनगर, या झोपडपट्ट्यांना पुराचा धोका आहे.