Breaking

Nagpur Municipal corporation election : मनपा निवडणुकीत भाजप पाळणार नाही ‘महायुतीचा धर्म’?

MLC Sandip Joshi urge BJP to contest all seats : आमदाराच्या विधानामुळे मित्र पक्षांमध्ये नाराजी; सर्व जागा भाजपनेच लढण्याचा आग्रह

Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपने डंका पिटला आहे. मात्र, यावेळी काँग्रेसने दंड थोपटले आहेत. यंदा सत्तापरिवर्तन होणार असा विश्वास काँग्रेसला आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या आमदाराने एक विधान करून मित्र पक्षांमध्ये धडकी भरली आहे. मनपा निवडणुकीत भाजप सर्व जागा लढण्याच्या विचारांत असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलं आहे. त्यामुळे भाजप महायुतीचा धर्म पाळणार नाही का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

नागपूर महापालिकेची निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढण्याचा भाजपचा विचार आहे. आमदार संदीप जोशी यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. मित्रपक्षांनी अवाजवी मागणी न करता अंथरूण पाहून पाय पसरावे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या या विधानानंतर मित्र पक्षांमध्ये चांगलीच अस्वस्थता पसरली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आधीच आपल्या मागण्या ठेवल्या आहेत.

Zilla Parishad Nagpur : पती-पत्नी एकत्रीकरणात प्रशासनाचा खोडा, शिक्षकांना मनःस्ताप

राष्ट्रवादीने तर ४० जागांवर लढणार असल्याचा दावाच केला आहे. ही मागणी अवाजवी असल्याचे भाजपचे मत आहे. ज्यांचा शहरात एकही नगरसेवक नाही, आमदार नाही, त्यांना ४० जागा कशा द्यायच्या, असा भाजपचा युक्तिवाद आहे. निवडणूक तयारीबाबत संदीप जोशी म्हणाले, भाजप २४ बाय ७ काम करणारा पक्ष आहे. निवडणूक आहे म्हणून वेगळी तयारी करण्याचा प्रश्न नाही. भाजपचे कार्यकर्ते नेहमीच लोकांच्या मदतीसाठी धावून जातात. त्यामुळे निवडणूक उद्या जरी झाली तरी भाजप निवडणुकीसाठी तयार आहे.

Local Body Elections : जिल्ह्यातील ११ नगरपालिकांमध्ये नवे प्रभाग, इच्थुक लागले कामाला

भाजपच्या आमदारांनी जास्तीत जास्त जनतेच्या संपर्कात राहावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेत प्रशासक राज सुरू आहे. त्यामुळे जनतेचा नगरसेवकांशी संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून अपेक्षित कामे झाली नसल्याने जनतेच्या मनात काहीशी नाराजी आहे. त्यामुळे नागरिकांना सोबत घेत त्यांची महापालिकेतील कामे करून द्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना देण्यात आल्या आहेत.