NMC earns a revenue of Rs 2.5 crores from birth and death registration alone : नागपूर महानगरपालिकेची अशीही कामगिरी, अनुपलब्ध जन्मदाखले देण्याची प्रक्रिया सुरू
Nagpur नागपूर महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कायम जाहीरपणे भाष्य करीत असतात. महापालिकेचे आर्थिक दारिद्र्य अधोरेखित करण्याचे काम बरेच नेते करीत असतात. पण एका विभागातील फक्त नोंदणीतून महापालिकेला तब्बल अडिच कोटींचा निधी मिळाल्याची बाब पुढे आली आहे.
महापालिकेच्या हद्दीतील रुग्णालयांमध्ये जन्माला आलेल्या मुलांना व महापालिकेच्या घाटावर अंत्यसंस्कार झालेल्यांना महापालिका जन्म व मृत्यूचे दाखले देते. गेल्या सव्वातीन वर्षांत महापालिकेने ४ लाख ४५ हजार ९८५ जन्मदाखले दिले आहेत. ७९ हजार ३१९ मृतांच्या वारसांना मृत्यूचे प्रमाणपत्र दिले आहे. यातून महापालिकेला अडीच कोटींच्या जवळपास निधी प्राप्त झाला आहे.
Maharashtra navnirman Sena : शेतकरी कर्जासाठी थांबले आहेत, सरकार झोपले का?” –
महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागाकडून या प्रमाणपत्रासाठी शुल्क आकारले जाते. गेल्या सव्वातीन वर्षांत २ कोटी ४१ लाख १ हजार १०० रुपयांचा महसूल यातून पालिकेला मिळाला आहे. जन्म प्रमाणपत्रातून १ कोटी ३९ लाख ६१ हजार ६८० रुपये, तर मृत्यू प्रमाणपत्रातून १ कोटी ०१ लाख ३९ हजार ४२० रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
जन्म व मृत्यू प्रमाणपत्र ४५ दिवसांच्या आत स्थानिक सक्षम प्राधिकरणाकडून देण्यात येते. २०२२ ते मार्च २०२५ या सव्वातीन वर्षांच्या काळात महापालिकेने ४ लाख ४५ हजार ९८५ जन्मप्रमाणपत्रांचे वितरण केले आहे.
जन्माच्या दाखल्यासंदर्भात एसआयटी गठित झाल्यामुळे जिल्ह्यातील ७००च्या वर अनुपलब्ध जन्मदाखल्यांना रद्द करण्यात आले होते. पण, आता महापालिकेने हे अनुपलब्ध जन्मदाखले देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महापालिकेच्या मुख्यालयातील जन्म-मृत्यू विभागात अनुपलब्धता दाखले व संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे आवाहन मनपाचे वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंनी आता अमित शाह यांच्या दारात हैदोस घातला पाहिजे !
गेल्या काही दिवसांपासून जन्माचे प्रमाणपत्र वादात सापडले आहे. बांगलादेशी घुसखोरांना रहिवासी करण्यासाठी हे प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप झाल्यानंतर शासनाने याच्या चौकशीसाठी एसआयटी गठित केली आहे. चौकशी होईपर्यंत हे प्रमाणपत्र देण्यावर बंदी घातली आहे.