Reduction in expenditure on schemes in the budget : महानगरपालिका आयुक्त पुढील महिन्यात सादर करणार बजेट
Nagpur : सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुनावणी झाली नाही. त्यामुळे महापालिका निवडणुकीवर अनिश्चिततेचे ढग दाटून आले आहेत. अशा स्थितीत प्रशासक म्हणून मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी हे अर्थसंकल्प सादर करतील.
यावेळी महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. आतापर्यंत महापालिकेला २०६३.५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. जीएसटी निधीव्यतिरिक्त इतर बाबींसाठी महापालिकेला केवळ २५८ कोटी रुपयांचे विशेष अनुदान मिळाले आहे. अशा स्थितीत सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात प्रशासक कात्री लावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dr. P. Anbalagan IAS : उद्योगांच्या समस्या जिल्हास्तरावरच सोडविणार !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात २५ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. सुनावणी पूर्ण न झाल्यास निवडणूक पुढे जाऊ शकते, असे संकेत आहेत. दरम्यान, यावेळीही महापालिका अर्थसंकल्प सादर करतील. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीवर महापालिकेचा अर्थसंकल्प अवलंबून राहणार आहे. महापालिकेचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प मार्चच्या पहिल्या आठवड्यात सादर होईल, असे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिकेत ५ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राज आहे. यावेळीही प्रशासकीय अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होण्याची दाट शक्यता आहे. १० वी – १२ वीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होतील. एप्रिल आणि मे महिन्यात निवडणुका घ्यायच्या असतील, तर त्यासाठी आरक्षण, प्रभाग रचना ते मतदार यादी अद्ययावत करावी लागेल. यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
Sudhir Mungantiwar : आरोग्यसेवेच्या बळकटीकरणासाठी मुनगंटीवार पुन्हा मैदानात
मात्र निवडणुकीबाबत सध्या तरी कोणतीही हालचाल दिसून येत नाही. असे असले तरी सत्तापक्षासह सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यामुळे महापालिकेच्या अर्थसंकल्पावर प्रशासकाची छाप राहणार की नव्या सरकारची हे येणारा काळच सांगेल. मिळालेल्या माहितीनुसार, विभागांनी अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली आहे. वेगवेगळे विभाग आपापल्या कमाईची आणि प्रस्तावित कामांची यादी तयार करत आहेत. त्याचा अर्थसंकल्पात समावेश केला जाणार आहे.